पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे रेल्व सेवा जागतिक दर्जाची बनविण्याचे स्वप्न आहे. या स्वप्नाचे प्रतीक असलेली वंदे भारत रेल्वे सेवा (Vande Bharat Express) कोल्हापुरातून लवकर सुरू करू, असे आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी दिले.
कोल्हापूर ते मुंबई मार्गावर धावणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या (Mahalakshmi Express) नव्या रूपातील (एलएचबी कोच) रेल्वे सेवेचे दानवे यांच्या हस्ते दृकश्राव्य माध्यमातून मुंबईतून हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. राजर्षी शाहू महाराज टर्मिनसवर हा सोहळा झाला.
(हेही वाचा – Maratha Reservation : सरकारच्या अधिसूचनेला न्यायालयात आव्हान देणार; काय म्हणाले वकील गुणरत्न सदावर्ते?)
या उद्घटनावेळी मंत्री दानवे म्हणाले, ‘हातकणंगले ते इचलकरंजी या ८ किलोमीटरच्या रस्त्यासाठी सर्वेक्षण, डीपीआर तयार झाला. कामही लवकरच सुरू होईल.’ खासदार महाडिक म्हणाले, ‘रेल्वेच्या विविध प्रश्नांवर तिन्ही खासदारांनी एकत्रित पाठपुरावा केला. त्याची दखल घेत रेल्वेमंत्री दानवे यांनी नव्या रूपातील महालक्ष्मी एक्सप्रेसची सेवा सुरू केली. रेल्वे प्रवाशांच्या हितांच्या अन्य मागण्यांची दखल घेतली आहे. जिल्ह्याच्या विकासाला बळ देणारी वंदे भारत २ महिन्यांत सुरू करण्याचे आश्वासन मिळाले आहे. सह्याद्री एक्स्प्रेस मुंबईपर्यंत सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
यावेळी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) धैर्यशील माने, संजय मंडलिक, पालकमंत्री हसन मुश्रीफ, विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे उपस्थित होते.
खासदार मंडलिक यांनी कोल्हापूरकरांना अयोध्येतील राम मंदिर दर्शनासाठी जाता येण्यासाठी कोल्हापूर ते अयोध्या एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्याबाबत रेल्वेमंत्र्यांना साकडे घातले. यावेळी रेल्वे स्थानकावरील लिफ्टचे उद्घाटनही करण्यात आले. सर्वात जास्त मी महालक्ष्मी एक्स्प्रेसने प्रवास करतो. रेल्वे प्रवाशांसह मलाही रेल्वेचा लाभ होणार आहे. रेल्वे प्रवासात मंडलिक कमी वेळा भेटले, महाडिक अधूनमधून भेटले. माने क्वचितच भेटतात, अशी आठवणही मुश्रीफ यांनी महालक्ष्मी एक्स्प्रेस प्रवासाबाबत सांगितली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community