Australian Open 2024 : रोहन बोपान्ना ४३ व्या वर्षी ऑस्ट्रेलियन पुरुष दुहेरीत विजेता 

अंतिम फेरीत बोपान्ना-एबडन जोडीने इटालियन वावासोरी आणि बोलेली जोडीचा ७-६ आणि ७-५ असा पराभव केला. 

221
Australian Open 2024 : रोहन बोपान्ना ४३ व्या वर्षी ऑस्ट्रेलियन पुरुष दुहेरीत विजेता 
Australian Open 2024 : रोहन बोपान्ना ४३ व्या वर्षी ऑस्ट्रेलियन पुरुष दुहेरीत विजेता 
  • ऋजुता लुकतुके

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात रॉड लेव्हर अरेनामध्ये पुरुषांचा दुहेरीतील अंतिम सामना सुरू होता. प्रतिस्पर्धी बोलेलीने फटकावलेला चेंडू नेटमध्ये अडकला. आणि समोरच्या बाजूला नेटजवळच उभा असलेला रोहन बोपान्ना जमिनीवर कोसळला. कारकीर्दीतील पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन दुहेरीतील विजेतेपद पटकावण्याची किमया त्याने केली होती. आणि त्यावर कडी म्हणजे वयाच्या ४३ व्या वर्षी ग्रँडस्लॅम विजेता ठरलेला तो टेनिसच्या इतिहासातील वयाने सगळ्यात ज्येष्ठ चॅम्पियन ठरला होता. (Australian Open 2024)

रोहन बोपान्नाने ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एबडनच्या साथीने बोलेली आणि वावासोरी या इटालियन जोडीचा ७-६ आणि ७-५ असा पराभव केला. दोन्ही संघ कोर्टवर तुल्यबळ होते. दोघांनी सामन्यातील पहिले दोन तास एकही सर्व्हिस गेम गमावला नव्हता. नेटजवळ दोघांचा खेळ चपळ होता. बेसलाईनवर एबडन आणि बोलेली असे संघातील एकेक खेळाडू वर्चस्व राखून होते. (Australian Open 2024)

पण, दोन संघातील फरत बोपान्ना ठरला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, इतक्या जवळ पोहोचल्यावर विजेतपद जिंकण्याची सगळ्यात जास्त ऊर्जा आणि ईर्ष्या बोपान्नाला होती. त्याने साथीदार एबडनचाही वेळोवेळी उत्साह वाढवला. (Australian Open 2024)

(हेही वाचा – Sports Mahakumbh : मुंबईत १९ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार क्रीडाकुंभ)

एबडनने आपली सर्व्हिस राखत मिळवला विजय

पहिला सेट टायब्रेकरवर गेल्यावर बोपान्नानेच खेळाची सूत्र हातात घेत हा सेट ७-० असा जिंकायला एबडनलाही प्रोत्साहित केला. तर दुसऱ्या सेटमध्ये ५-५ अशी बरोबरी असताना बोपान्नाने समोरच्या खेळाडूंवरील दडपण कायम ठेवलं. हा गेम जिंकून बोपान्ना, एबडन जोडीने ६-५ अशी आघाडी मिळवली. आणि मग एबडनने आपली सर्व्हिस राखत ७-५ असा विजयही मिळवला. (Australian Open 2024)

रोहनचे वेगवान रिटर्स आणि बिनचूक सर्व्हिस यांचा सामन्यावर प्रभाव राहिला. तर एबडननेही बेसलाईनवर सरस खेळ करत आणि खोलवर अचूक फटके मारत त्याला चांगली साथ दिली. बोपान्नासाठी हा आठवडा न विसरता येण्यासारखा ठरलाय. दोनच दिवसांपूर्वी दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत तो अव्वल स्थानावर पोहोचलाय. भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री साठी त्याचं नामांकन झालंय. आणि आता त्याने ४३ व्या वर्षी पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्याचं स्वप्न पूर्ण केलंय. (Australian Open 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.