गर्दीच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी तसेच प्रवासाला लागणारा पाऊण ते एक तासाचा वेळ वाचण्यासाठी वरळी ते मारिन ड्राइव्हदरम्यान रस्ता बांधकाम सुरु आहे. मुंबई सागरी किनारा मार्गावरील पहिल्या टप्प्यात प्रियदर्शनी ते मारिन ड्राइव्हपर्यंत साडेतीन किलोमीटर लांबीचा बोगदा सुरु होणार आहे. पहिला टप्पा ९ फेब्रुवारीपर्यंत खुला करण्याचे उद्दिष्ट मुंबई महापालिकेने (BMC) ठेवले आहे. (Mumbai Coastal Road )
सध्या या मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. पहिला टप्पा सुरु झाल्यांनतर जो प्रवास करण्यासाठी पाऊण तास लागत होता त्याठिकाणी केवळ पंधरा ते वीस मिनिट लागणार आहे. प्रतितास ८० किमी वेगाने वाहन चालवण्याची परवानगी या सागरी किनारा मार्गावर असेल. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याआधीच एक टप्पा खुला करण्यासाठी पालिकेची धडपड सुरू आहे.(Mumbai Coastal Road )
(हेही वाचा : Manoj Jarange Patil यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिसुचनेचे काय आहे महत्त्व?)
वाहनांच्या वेगावर लक्ष ठेवण्यासाठी वाहतूक व्यवस्थापन नियंत्रण प्रणाली (टीएमसी) बसवण्यात आली आहे. जर कोणी स्पीड ब्रेक घेतला तर तो कॅमेऱ्यात कैद होईल. तसेच, वाहनाची माहिती वाहतूक पोलिसांना दिली जाईल आणि दंड आकारायचा की नाही हे ते ठरवतील. प्रत्येक १०० मीटरवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. वरळी ते मरीन ड्राइव्हपर्यंत १०० सीसीटीव्ही कॅमेरे असतील. आगीत कोणतीही जीवितहानी होणार नाही याची खातरजमा करण्यासाठी एक यंत्रणा बसवण्यात आली आहे. यामुळे बोगद्यातील धूर आपोआप निघून जाईल. देशात प्रथमच असे केले जात आहे. तसेच, ४ जलद प्रतिसाद वाहने, अग्निशमन दलाची दोन वाहने देखील असतील.
हेही पहा –