कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील (Dr. Babasaheb Ambedkar Hospital) शवागृहाची जागा अपुरी पडू लागली असून हे शवागृह जुने झाल्याने तसेच त्यामध्ये तांत्रिक बिघाड होऊ लागल्याने अखेर या शवागृहाची उभारणी नव्याने करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या नव्या उभारणीमध्ये शवागाराची क्षमताही वाढवण्यात येणार आहे. (Kandivali)
कांदिवली ते दहिसर बाहेरील रुग्ण दाखल
पश्चिम उपनगरातील कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापालिका रुग्णालय (Dr. Babasaheb Ambedkar Hospital) अर्थात कांदिवली शताब्दी रुग्णालय सुमारे ४५५ खाटांचे आहे. उपनगरीय रुग्णालयांपैंकी हे प्रमुख रुग्णालय असून याठिकाणी कांदिवली ते दहिसरच्या बाहेरुन मोठ्याप्रमाणात गंभीर आजारांसह अपघात ग्रस्त रुग्ण दाखल होत असतात. (Kandivali)
(हेही वाचा – Devendra Fadanvis : मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार का? काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? )
तब्बल १० ते १२ वर्षे जुने शवागृह
यामध्ये अनेकदा गंभीर आजारांचे रुग्ण दगावण्याचे प्रकार अधिक असते. त्यामुळे रुग्णाचे मृत शरीर जतन करण्यासाठी रुग्णालयामध्ये असलेल्या शवागारात क्षमतेपेक्षा जास्त शव ठेवल्या जात आहे. तब्बल १० ते १२ वर्षे या शवागाराच्या बांधकामाला झाले असून या शवागारात वारंवार बिघाड होत आहे. शवागाराचा उपयुक्त कालावधी संपुष्टात आलेला असून शवागाराची क्षमता अपुरी पडत असल्याने हे जुने शवागृह बदलून वाढीव क्षमतेचे नवीन शवागृह उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. (Kandivali)
तीन महिन्यात केले जाणार नवीन बांधकाम
या शवागृहाच्या नव्याने उभारणीसाठी १ कोटी ०९ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. यासाठी ब्लुस्टार लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. या शवागृहाचे बांधकाम रुग्णालयाकडून शवागार बंद करून दिल्यानंतर पुढील तीन महिन्यांमध्ये पूर्ण केले जाईल, असे यांत्रिक व विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. (Kandivali)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community