रामा रामण्णा (Raja Ramanna) हे महान वैज्ञानिक होते. भारताच्या अणूबॉम्ब प्रकल्पात त्यांचा सिंहाचा वाटा होता. होमी भाभा यांसारख्या दिग्गज शास्त्रज्ञांबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती. राजा रामण्णा यांचा जन्म २८ जानेवारी १९२५ ला म्हैसूर संस्थानातील तुमकूर येथे झाला. सुरुवातीला असे वाटले होते की, त्यांचा कल साहित्य आणि शास्त्रीय संगीताकडे आहे. आई-वडिलांनी तसे त्यांना प्रोत्साहन देखील दिले होते. मात्र नंतरच्या काळात ते भौतिकशास्त्राकडे वळले.
अण्वस्त्रांवर वैज्ञानिक संशोधनाचा विस्तार केला
त्यांनी मद्रास विद्यापीठातून भौतिकशास्त्रात बीएससी पदवी मिळवली आणि १९४७ मध्ये शास्त्रीय संगीतात बीएची पदवीही मिळवली. मात्र १९४७ मध्ये त्यांनी बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून भौतिकशास्त्रात एमएससी पूर्ण केले. त्यांना कॉमनवेल्थ शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आणि १९५२ मध्ये डॉक्टरेट पूर्ण करण्यासाठी ब्रिटनलादेखील जाऊन आले. त्यांनी न्यूक्लियर फिजिक्समध्ये पीएचडी देखील केले होते. त्यांनी भारताच्या अणुचाचणीत देखील सहभाग घेतला होता. १९६४ मध्ये अणुचाचणीत सहभागी झाल्यानंतर त्यांना होमी जहांगीर भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली. पुढे तर त्यांनी मजलच मारली आणि १९६७ मध्ये ते या प्रकल्पाचे संचालक झाले. रामण्णा (Raja Ramanna) यांनी अण्वस्त्रांवर वैज्ञानिक संशोधनाचा विस्तार केला. त्यांचे पर्यवेक्षण केले आणि पर्यवेक्षण करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या टीमचे ते पहिले संचालक अधिकारी होते.
(हेही वाचा Devendra Fadanvis : मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार का? काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? )
आण्विक उपकरणाची चाचणी घेतली
१९७४ मध्ये स्माइलिंग बुद्धा या सांकेतिक नावाखाली आण्विक उपकरणाची चाचणी घेतली. ते ४ दशकांहून अधिक काळ भारताच्या आण्विक प्रकल्पाशी जोडलेले होते. त्यांनी भारतीय सैनिकांसाठी इंडस्ट्रियल डिफेन्स प्रोग्रामही सुरू केला होता. भारताच्या आण्विक प्रकल्पाच्या उभारणीसाठी त्यांनी केलेल्या कामाच्या सन्मानार्थ त्यांना पद्मविभूषण देण्यात आले. २००४ मध्ये त्यांचे निधन झाले.
Join Our WhatsApp Community