अमेरिकेतील यशस्वी भारतीय उद्योजक Vinod Khosla

265
विनोद खोसला (Vinod Khosla) हे अमेरिकन आणि भारतीय उद्योजक आहेत. ते व्हेंचर कॅपिटालिस्ट देखील आहेत. ते सन मायक्रोसिस्टीमचे सह-संस्थापक आणि खोसला व्हेंचर्सचे संस्थापक आहेत. विनोद खोसला (Vinod Khosla) यांचा जन्म २८ जानेवारी १९५५ रोजी पुण्यात पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे वडील भारतीय सैन्यात अधिकारी होते.
आपल्याप्रमाणे मुलानेही सैन्यात जावे असे वडिलांना वाटत होते. मात्र किशोरवयात इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंग टाइम्समध्ये त्यांनी इंटेलच्या स्थापनेची कहाणी वाचली आणि त्यांच्यामध्ये उद्योजकतेची आवड निर्माण झाली. पुढे खोसला यांनी नेटवर्किंग, सॉफ्टवेअर आणि ऍल्टरनेटिव्ह एनर्जी टेक्नॉलॉजीसारख्या क्षेत्रात सुरुवातीच्या व्हेंचर कॅपिटल गुंतवणुकीतून त्यांनी मालमत्ता निर्माण केली. ते सर्वात यशस्वी आणि प्रभावशाली व्हेंचर कॅपिटलिस्ट आहेत.
त्यांचे म्हणणे असे आहे की, भांडवलशाहीचा वापर सामाजिक प्रभावासाठी करायला हवा. त्याचबरोबर खोसला (Vinod Khosla) यांनी असे म्हटले आहे की, मशीन लर्निंग टेक्नॉलॉजीमुळे अनेकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात आणि उत्पन्नातील असमानता वाढेल. पण प्रत्येकाला मूलभूत उत्पन्न देण्यासाठी पुरेसा GDP देखील तयार होईल. २०१४ मध्ये फोर्ब्सने त्यांची युनायटेड स्टेट्समधील ४०० सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये नोंद केली होती आणि २०२१ मध्ये ते फोर्ब्स ४०० च्या यादीत ९२ व्या स्थानावर होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.