ऋजुता लुकतुके
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित फायटर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (Fighter Box Office) सध्या दणका उडवून दिला आहे. गुरुवारी २५ जानेवारीला सिनेमा भारतभर प्रदर्शित झाला. आणि गणतंत्र दिवसाच्या सुटीमुळे मिळालेल्या अतिरिक्त बुकिंगमुळे वीकएंड पूर्वीच्या दोन दिवसांतच सिनेमाने ६५ कोटी रुपयांची मजल मारली आहे.
पहिल्या दिवशी २१ कोटींची कमाई –
ह्रतिक रोशन आणि सिद्धार्थ आनंद जोडीचा हा तिसरा एकत्र (Fighter Box Office) सिनेमा आहे. यापूर्वी बँग बँग आणि वॉर हे दोन सिनेमे दोघांनी एकत्र केले आहेत. यावेळी ह्रतिक बरोबर आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणही या सिनेमात आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने देशभरात २१ कोटी रुपयांची कमाई केली. पण, चित्रपटाचे सकारात्मक रिव्ह्यू पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी कमाई एकदम (Fighter Box Office) दुप्पट होऊन ४१ कोटी रुपयांच्याही वर गेली.
(हेही वाचा – गुजरातमधील निसर्ग कवी Rajendra Shah)
पहिल्या चार दिवसांमध्ये 100 कोटींची कमाई ?
सिनेमाचा आताचा धडाका पाहता, पहिल्या चार दिवसांतच हा सिनेमा १०० कोटी क्लबचा सदस्य बनू शकेल.
‘हनुमान’ आणि ‘मै अटल हू’ असे आणखी दोन हिंदी सिनेमे सध्या चित्रपटगृहांमध्ये सुरू आहेत. पैकी मै अटल हू या सिनेमावर फ्लॉपचा शिक्का बसला आहे. आणि चित्रपटाची संपूर्ण कमाई १० कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. तर हनुमान हा आणखी एक सिनेमा आपल्या शेवटच्या काही आठवड्यात आहे. आणि आतापर्यंत ५० कोटी रुपयांची कमाई (Fighter Box Office) सिनेमाने केली आहे.
(हेही वाचा – Binny Bansal Retired : फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिनी बंसल यांचा राजीनामा)
‘मै अटल हू’ हा सिनेमा पंकज त्रिपाठी यांची मुख्य भूमिका असलेला सिनेमा आहे. पण, त्याची म्हणावी तशी जाहिरात झाली नसल्यामुळे तो काहीसा मागे पडला आहे. (Fighter Box Office)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community