Gyanvapi Mosque: ज्ञानवापीच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण अहवालातून मोठी माहिती उघड, १५ शिवलिंगे आणि विविध काळातील ९३ नाणी सापडली

282

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या पथकाला (Archaeological Survey of India)ज्ञानवापीच्या (Gyanvapi Mosque) सर्वेक्षणात ५५ हिंदू देवतांची शिल्पे सापडली आहेत. त्याचबरोबर विविध काळातील ९३ नाणीही सापडली आहेत. दगडी मूर्तीबरोबरच विविध धातू आणि टेराकोटासह घरगुती वापराच्या २५९ वस्तूदेखील सापडल्या आहेत.

या सापडलेल्या शिल्पांपैकी एका दगडावर ‘राम’ असे लिहिले आहे. जीपीआर (GPR) सर्वेक्षणात मुख्य घुमटाखाली मौल्यवान पाचूच्या आकाराच्या तुटलेला मौल्यवान धातू सापडला आहे. याचे मुख्य शिवलिंग म्हणून वर्णन केले जात आहे. या जागी खाणकाम आणि सर्वेक्षण करण्यात आले आहे.

(हेही वाचा –Binny Bansal Retired : फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिनी बंसल यांचा राजीनामा )

हिंदू देवतांची ५५ शिल्पे सापडली… (55 sculptures of Hindu deities)
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागने केलेल्या सर्वेक्षणात ज्ञानव्यापी मशीद संकुलात एकूण ५५ दगडी हिंदू देवतांची शिल्पे आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये १५ शिवलिंगे, ३ विष्णू शिल्पे, गणपतीची ३, नंदीची २ शिल्पे, २ कृष्णाची, तर ५ हनुमानाची शिल्पे असल्याचे एएसाय अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.