अयोध्येत राम लल्लाच्या प्रतिष्ठापनेनंतर रामभक्तांना प्रभु रामाशी संबंधित विविध तीर्थक्षेत्रांना भेट द्यायची असेल, तर ‘ही’ बातमी शेवटपर्यंत वाचा.
भारतीय रेल्वे अर्थात आयआरसीटीसी (IRCTC)कडून अयोध्येपासून रामेश्वरपर्यंत तीर्थयात्रा करणाऱ्यांकरिता एक छानसे टूर पॅकेज देण्यात आले आहे. नुकतेच हे पॅक आयआरसीटीसीने लॉंच केले आहे. हा प्रवास करणाऱ्या प्रवाशाला प्रभु श्रीराम, अयोध्या, नंदीग्राम, जनकपूर (नेपाळ), सीतामढी, बक्सर, वाराणसी, प्रयागराज, शृंगवरपूर, चित्रकूट, नाशिक, हम्पी, रामेश्वरम, भद्राचलम आणि नागपूर या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल. जर तुम्हाला या प्रवासात रस असेल, तर जाणून घ्या या पॅकेजशी संबंधित काही खास गोष्टी.
आयआरसीटीसीने आपल्या अधिकृत ‘X’ अकाउंटवरून या उपक्रमाविषयी माहिती दिली आहे. भारत गौरव डीलक्स एसी टूरिस्ट ट्रेन 17 रात्री आणि 18 दिवसात संपूर्ण प्रवास पूर्ण करेल. 5 मार्च 2024 रोजी दिल्लीहून हा प्रवास सुरू होईल. या प्रवासात प्रवाशांना या पॅकेजमधील खाण्यापिण्याची काळजी करण्याची गरज नाही. दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकापासून ही यात्रा सुरू होणार आहे. यात्रेचा पहिला थांबा अयोध्या असेल. या गाडीचा शेवटचा थांबा नागपूर असेल. ही गाडी नागपूरहून सुटेल आणि 18व्या दिवशी दिल्लीला परतेल. हे पॅकेज प्रति व्यक्ती 94,600 रुपयांपासून सुरू होईल.
Experience the divine aura of sacred places associated with the life of Maryada Purushottam Sri Ram Ji in the comfort of Bharat Gaurav Deluxe AC Tourist train on IRCTC’s Sri Ramayana Yatra”.
🌟 Tour Highlights:
Tour Name: SRI RAMAYANA YATRA
Duration (ex Delhi): 17 Nights/18… pic.twitter.com/X7ibwFHYNT— IRCTC (@IRCTCofficial) January 25, 2024
कशी असेल ‘ही’ रामायण यात्रा
– या यात्रेदरम्यान प्रवाशांना अयोध्या, नंदीग्राम, जनकपूर (नेपाल), सीतामढी, बक्सर, वाराणसी, प्रयागराज, श्रृंगवेपूर, चित्रकूट, नाशिक, हम्पी, रामेश्वरम, भद्राचलम आणि नागपूर या पवित्र ठिकाणांना भेट देता येईल.
– बोर्डिंग पॉईंट्स- दिल्ली सफदरजंग, गाझियाबाद, अलीगढ, टुंडला, इटावा, कानपूर, लखनौ
डी-बोर्डिंग पॉईंट्स- वीरांगना लक्ष्मीबाई, ग्वाल्हेर, आग्रा, मथुरा, दिल्ली सफदरजंग
– सहल किती दिवस चालेल – 17 रात्री आणि 18 दिवस -प्रवासाचा दिनांक – 5 मार्च 2024
-प्रवासाची पद्धत (mode of travel) – रेल्वे