मागील काही दिवसांपासून देशातील वातावरणात मोठा बदल होत आहे. डोंगराळ भागात सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसून येत असून मराठवाड्यासह विदर्भात गारठा वाढला आहे.
पुढील दोन ते तीन दिवसांत तापमानात वाढ होईल आणि थंडीचा प्रभाव कमी होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पावसाची शक्यतादेखील वर्तवण्यात आली आहे.
(हेही वाचा – Bihar Political Crisis : पाटण्यात बैठकांचे सत्र, नितीशकुमार आज राजीनामा देणार ?)
मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता…
वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे येत्या ४८ तासांत जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. याशिवाय काही भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रातला हवामानाचा अंदाज
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्हा वगळता उर्वरित महाराष्ट्रात पहाटेचे किमान तपामान १४ डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पहाटेचे तापमान ८ ते १० डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असू शकते.
वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव
वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे येत्या ४८ तासांत जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. याशिवाय काही भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community