बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी (२८ जानेवारी) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे बिहारमध्ये एकदा सत्तापालट होणार असल्याची चिन्हे आहेत. नितीश कुमार यांनी राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. भारतीय जनता पक्षानेही त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे.
भाजपसोबत मिळून जेडीयू सरकार स्थापन करेल, हे आता स्पष्ट झालं आहे. नितीश कुमार यांनी राजभवनावर राज्यपालांची भेट घेत राजीनामा सोपवल्याचं समोर आलं आहे. बिहारमध्ये सध्या राजकीय उलथापालथ सुरू आहे. त्यांच्यासोबत आणखी तीन मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यांच्या घोषणेनंतर एनडीएच्या आमदारांची बैठक होईल. त्यानंतर सायंकाळी ४ च्या सुमारास जदयू प्रमुख नितीश कुमार हे पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. नितीश कुमार यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितला होता. राज्यपाल सचिवालयासह सर्व कार्यालयांना रविवारी सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
बिहार विधानसभेत जदयूकडे ४५ आमदार आहेत, तर भाजपकडे ७६ आणि जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तान आवाम मोर्चाकडे ४ आमदार आहेत. अशा स्थितीत तिन्ही पक्षांकडे मिळून १२५ आमदार आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा १२२ असून तीन अधिक आमदार एनडीएकडे असतील.
Join Our WhatsApp CommunityBihar CM and JD(U) president Nitish Kumar meets Governor at Raj Bhavan; tells him – We have decided to sever ties with the mahagathbandhan in the state. pic.twitter.com/qtO0zH1jAB
— ANI (@ANI) January 28, 2024