उत्तराखंडमधील (Uttarakhand) मदरशांच्या अभ्यासक्रमात मोठा बदल होणार आहे. (Ram katha In Madarsa) मदरशातील मुलांना प्रभु श्रीरामाच्या कथा शिकवल्या जातील, असे उत्तराखंड वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांनी सांगितले आहे. वक्फ बोर्डाचे प्रमुख शादाब शम्स (Shadab Shams) म्हणाले की, या वर्षी मार्चमध्ये सुरु होणाऱ्या सत्रात नवीन अभ्यासक्रम लागू केला जाईल. प्रभु श्रीराम हे एक असे चरित्र आहे की, ज्याबद्दल प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे आणि त्याचे पालन केले पाहिजे.
(हेही वाचा – Deepak Kesarkar: अभियांत्रिकी शाखेत मराठी विषय सक्तीचा, दीपक केसरकर यांचा आदेश)
मदरशामध्ये श्रीरामाचे पठण
वक्फ बोर्डाचे प्रमुख शादाब शम्स (Shadab Shams) पुढे म्हणाले की, प्रभु श्रीराम सिंहासन सोडून आपल्या वडिलांचे वचन पूर्ण करण्यासाठी वनवासात गेले होते. प्रभु श्रीरामासारखा पुत्र कोणाला नको असेल ? मदरशातील विद्यार्थ्यांना पैगंबर महंमद यांच्यासमवेत प्रभु श्रीरामाच्या जीवनाबद्दल शिकवले जाईल. उत्तराखंडमध्ये वक्फ बोर्डाअंतर्गत 117 मदरसे आहेत.
‘भगवान श्रीरामाचे गुण प्रत्येकाने पाळले पाहिजेत. मग तो कोणताही धर्म असो. भगवान श्रीरामाच्या कथांमधून मुले चांगले गुण आणि विधी शिकतील. डेहरादून, उधमसिंह नगर, हरिद्वार आणि नैनीताल या जिल्ह्यांमध्ये चालणाऱ्या मदरशांमध्ये मुलांना श्रीरामाच्या कथा शिकवल्या जातील’, असे शादाब शम्स यांना घोषित केले.
(हेही वाचा – Maratha Reservation : छगन भुजबळांनंतर राणेंचाही मराठा आरक्षणाच्या मसुद्याला विरोध)
भारताला प्रभु रामाचा अभिमान आहे
वक्फ बोर्डाचे (Waqf Board) प्रमुख शादाब शम्स पुढे म्हणाले की, आपल्या मुलांमध्ये भगवान श्रीरामाचे गुण असावेत, असे कोणाला वाटत नाही. श्रीरामांऐवजी आपण मुलांना त्या राजाबद्दल शिकवायला हवे का, ज्याने आपल्या वडिलांना तुरुंगात टाकले आणि आपल्या भावांचा गळा कापला, असे म्हणत शम्स यांनी औरंगजेबाचा (Aurangzeb) इतिहास शिकवण्यावर शरसंधान साधले. (Ram katha In Madarsa)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community