मुंबई ते अहमदाबाद या स्थानकांदरम्यान धावणारी ‘वंदे भारत’ एक्सप्रेस आता सुपरफास्ट होणार आहे. (Vande Bharat Express) याकरिता रुळांची क्षमता आणि इतर कामे करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे या एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची नाराजी आता लवकरच दूर होणार आहे.
देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारकडून विविध शहरांदरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली. या एक्सप्रेसला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
(हेही वाचा – Raj Thackeray : ‘तयारीला लागा मी येतोय’; राज ठाकरेंचा चार दिवस नाशिक दौरा )
प्रवाशांची नाराजी होणार दूर…
वंदे भारत एक्सप्रेस ताशी १६० किलोमीटर वेगाने धावणार आहे. याकरिता सुमारे ४ हजार कोटी रुपयांचा खर्चही करण्यात आला आहे. सध्या धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ९० ते ११० किमी वेगाने चालवावी लागते, कारण वेगाने धावण्याची क्षमता असली, तरीही त्या क्षमतेचे रेल्वे रुळ नसल्याने अनेक विभागात ती कमी क्षमतेने चालवावी लागते. त्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होऊ लागली होती. याची दखल घेत रेल्वेगाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रेल्वेमार्गांचे अद्ययावतीकरण करण्याबरोबरच सिग्नल यंत्रणाही सक्षम केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community