Veturi Murthy : सदाबहार तेलगू गीते लिहिणारे वेटुरी मूर्ती

Veturi Murthy : वेटुरी मूर्ती यांच्या अभिनयाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी एका चित्रपटात ठग-स्वामीची भूमिका केली आणि त्या विनोदी भूमिकेसाठी त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

211
Veturi Murthy : सदाबहार तेलगू गीते लिहिणारे वेटुरी मूर्ती
Veturi Murthy : सदाबहार तेलगू गीते लिहिणारे वेटुरी मूर्ती
वेटुरी मूर्ती (Veturi Murthy) यांनी तेलगूमध्ये हजारो गाणी लिहिली आणि अजरामर केली. त्याचबरोबर त्यांनी काही चित्रपटांमध्ये कॅमिओ भूमिकाही केल्या आहेत. त्यांच्या अभिनयाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी एका चित्रपटात ठग-स्वामीची भूमिका केली आणि त्या विनोदी भूमिकेसाठी त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. सिरी सिरी मुव्वा (Siri Siri muvva) या चित्रपटासाठी त्यांनी लेखक संवादही लिहिले होते.
पत्रकार म्हणून कामाला सुरुवात

वेटुरी यांचा जन्म २९ जानेवारी १९३६ रोजी आंध्र प्रदेशमध्ये एका तेलगू ब्राह्मण कुटुंबात झाला. वेटुरी हे तेलगू रिसर्च स्कॉलर वेटुरी प्रभाकर शास्त्री यांचे पुतणे. त्यांचे आजोबा वेटुरी सुंदरा शास्त्री हे देखील कवी होते. सुरुवातीला पत्रकार म्हणून काम करताना वेटुरी यांचा तेलगू चित्रपटसृष्टीशी संपर्क झाला. ज्येष्ठ गीतकार दाशरथी यांना ते वारंवार भेटत असत. १९५३ रोजी दिग्गज दिग्दर्शक व्ही. नागय्या यांनी ना इल्लू या चित्रपटात भूमिका दिली. मात्र त्यांना वाटलं की ते अभिनय करु शकत नाहीत म्हणून त्यांनी क्षमायाचना करत चित्रपटतून माघार घेतली.

१९७४ मध्ये वेटुरी यांनी के. विश्वनाथ यांनी दिग्दर्शित केलेल्या ’ओ सीता कथा’ (O Seeta Katha) या चित्रपटासाठी हरिकथा स्वरूपात “भारतनारी चरितमु” हे पहिले गीत लिहिले आणि गीतकार म्हणून त्यांची कारकीर्द सुरु झाली.

(हेही वाचा – Orange Subsidy : निर्यात संत्र्याला किलोमागे मिळणार ४४ रुपयांचे अनुदान; बांगलादेशात ८८ रुपये आयात शुल्क)

अनेक पुरस्कारांवर कोरले नाव 
१९७०, १९८०, १९९० आणि २००० अशी चार दशकं त्यांनी तेलगू चित्रपटांसाठी सदाबहार गाणी लिहिली. वेतुरी यांना साहित्य आणि चित्रपटांमधील योगदानासाठी अनेक राष्ट्रीय आणि प्रादेशिक पुरस्कार मिळाले आहेत. आचार्य नागार्जुन विद्यापीठाच्या २३ व्या दीक्षांत समारंभात त्यांना मानद डॉक्टरेट बहाल करण्यात आले. २००७ मध्ये त्यांना जांध्याला स्मृती पुरस्कार (Jandhyala memorial award) मिळाला. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. त्याचबरोबर इतर अनेक पुरस्कारांवर त्यांनी आपले नाव कोरले आहे. असं म्हणावं लागेल की त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत गाणी लिहिली. २०१० च्या २२ मे रोजी त्यांचे निधन झाले आणि त्यांचे शेवटचे गीत २०१२ रोजी प्रदर्शित झाले. (Veturi Murthy)
हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.