आंतोन चेखव (Anton Chekhov) हे रशियन कथाकार आणि नाटककार होते. त्यांना दीर्घायुष्य लाभले नसले तरी त्यांनी लिहिलेल्या नाटकांची चर्चा सर्वत्र पसरली आणि त्यांच्या कथांना जगभरातील समीक्षकांनी डोक्यावर घेतले. ते चिकित्सक देखील होते, त्यामुळे साहित्य रसिकांसह त्यांनी रुग्णांची सेवा केली. ते म्हणायचे की, औषध ही माझी पत्नी आहे आणि साहित्य ही माझी प्रेयसी आहे.
(हेही वाचा – Maharashtra NCC : महाराष्ट्र एनसीसी संचालनालय सलग तिसऱ्यांदा देशात प्रथम; प्रधानमंत्री बॅनर विजेत्याचा बहुमान)
१८८७ मध्ये लिहिले ‘इव्हानोव्ह’ हे पहिले नाटक
त्यांचा जन्म २९ जानेवारी १८६० रोजी दक्षिण रशियातील तगानरोग येथे झाला. त्यांनी मॉस्कोमधील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण पूर्ण करुन चिकित्सक म्हणून काम करायला सुरूवार केली. १८८० मध्ये त्यांनी पहिली कथा प्रकाशित केली आणि १८८४ मध्ये त्यांचा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. १८८६ मध्ये त्यांचा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला आणि १८८७ मध्ये ‘इव्हानोव्ह’ (Ivanov) हे पहिले नाटक आले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी चार नाटके लिहिली.
आजही सादर केली जातात नाटके
चेखव यांनी शेकडो कथा लिहिल्या. यामध्ये समाजकंटकांचे उपहासात्मक चित्रण करण्यात आले आहे. त्यांच्या छोट्या कादंबऱ्यांमध्ये मातृभूमीविषयी ओढ दिसून येते आणि लोकांच्या भावना देखील त्यांनी योग्यरित्या रेखाटल्या आहेत. आजही त्यांची सर्व नाटके रशियातील अनेक थिएटरमध्ये सादर केली जातात. १९१८ ते १९५६ दरम्यान सोव्हिएत युनियनमध्ये त्यांचे साहित्य ७१ भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे. या सर्व पुस्तकांची संख्या ४९ लाख आहे.
(हेही वाचा – Neelam Gorhe : सभागृहाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी विरोधक-सत्ताधाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी – डॉ. नीलम गोऱ्हे)
भारतीय लेखकांनी उधळली स्तुतीसुमने
चेखव इतके प्रसिद्ध झाले की अनेकांवर त्यांचा प्रभाव पडला. बुनिन, कुप्रिन, गॉर्की इत्यादी अनेक रशियन लेखकांवर त्यांचा प्रभाव पडला. त्याचबरोबर युरोप, आशिया आणि अमेरिकेतील लेखकांनाही त्यांच्या शैलीचे महत्त्व पटू लागले. भारतीय लेखकांनी देखील त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. प्रख्यात लेखक प्रेमचंद म्हणतात, “चेखव हे जगातील सर्वोत्तम कथाकार आहे”. १५ जुलै १९०४ मध्ये टीबी या आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला. जर त्यांना दीर्घायुष्य लाभले असते तर त्यांनी निश्चितच उत्तमोत्तम साहित्यकृती निर्मित केली असती. त्यांच्या अनेक कथा आणि नाटके अनेक भारतीय भाषांमध्ये प्रकाशित झाली आहेत. (Anton Chekhov)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community