Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ‘परीक्षा पे चर्चा’, जगभरातील २ कोटींहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी केली नोंदणी

शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपाल, नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी विशेष व्यवस्था करण्याची विनंती केली आहे.

300
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार 'परीक्षा पे चर्चा', जगभरातील २ कोटींहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी केली नोंदणी
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार 'परीक्षा पे चर्चा', जगभरातील २ कोटींहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी केली नोंदणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा ‘परीक्षा पे चर्चा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचा सातवा भाग सोमवारी, (29 जानेवारी) सकाळी ११ वाजता सादर होणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत ते जगभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांना तणावापासून दूर राहण्याचा मंत्र या कार्यक्रमात ते देतील.

देश-विदेशातील 2.27 कोटींहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी यासाठी नोंदणी केली आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आहे. दिल्लीतील प्रगती मैदान संकुलातील भारत मंडपम येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी ३ हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाचे संक्षिप्त सचित्र वर्णन भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या ‘X’ हँडलवर शेअर केले आहे.

(हेही करा – Sudan Abyei Clash: सुदानमध्ये अंदाधुंद गोळीबार, ५२ जणांचा जागीच मृत्यू)

शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये कार्यक्रमाचे प्रसारण
दरम्यान, शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपाल, नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी विशेष व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. देशभरातील शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये या कार्यक्रमाचे प्रसारण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी २०१८मध्ये ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम सुरू केला होता. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाची किशोरवयीन आणि तरुण वर्ग वाट पाहत असून गेल्या वर्षी या कार्यक्रमासाठी ३१ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.