Thackeray group criticizes Nitish Kumar : नितीश कुमार यांच्यावर ठाकरे गटाची सडकून टीका; म्हणाले …

भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची भीती वाटते. प्रभू श्रीराम व ‘ईव्हीएम’देखील त्यांना या पराभवापासून वाचवू शकत नाही हे त्यांना माहित आहे. ‘अब की बार चारसौ पार’ हा मोदी-शहांचा नारा म्हणजे उसने अवसान आहे.

350
Thackeray group criticizes Nitish Kumar : नितीश कुमार यांच्यावर ठाकरे गटाची सडकून टीका; म्हणाले ...

गेल्या काही वर्षांत नितीश कुमार यांच्या भूमिकांमुळे बिहारच्या राजकारणात अनेकदा भूकंप येऊन गेले. अशातच पुन्हा एकदा त्यांच्यामुळे बिहारच्या राजकारणाची दिशा बदलली. रविवार २८ जानेवारी रोजी नितीश कुमार यांनी राजीनामा देऊन भाजपसोबत युती करून नव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान या सगळ्या प्रकारावर ठाकरे गटाने (Thackeray group criticizes Nitish Kumar) सडकून टीका केली आहे.

(हेही वाचा – Kutch Earthquake : कच्छमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के)

हा नितीश कुमारांचा राजकीय अंत –

ठाकरे गटाचे (Thackeray group criticizes Nitish Kumar) मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून नितीश कुमार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. “नितीश कुमार यांच्या पुढाकारानेच इंडी आघाडीची सुरुवात झाली. पुढे जाऊन तेच या आघाडीचे नेतृत्व करतील अशी सर्वांची आशा होती. मात्र त्यांनी तसं केलं नाही. या वयात त्यांनी भाजपसोबत युती करून सत्तास्थापन केली. मात्र हा त्यांचा राजकीय अंत आहे.” अशा शबदांमध्ये ठाकरे गटारे नितीश कुमार यांच्यावर टीका (Thackeray group criticizes Nitish Kumar) केली आहे.

(हेही वाचा – Sudan Abyei Clash: सुदानमध्ये अंदाधुंद गोळीबार, ५२ जणांचा जागीच मृत्यू)

भाजप पक्षाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची भीती वाटते –

भाजप व संघ परिवाराचा विरोध करण्याचा, शेवटपर्यंत त्यांच्या विरुद्ध लढण्याचा नितीश कुमार यांचा निर्धार होता. मात्र त्या निर्धाराचे धोतर आता सुटले असून नितीश कुमार यांनी पलटी मारली आहे. भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची भीती वाटते. प्रभू श्रीराम व ‘ईव्हीएम’देखील त्यांना या पराभवापासून वाचवू शकत नाही हे त्यांना माहित आहे. ‘अब की बार चारसौ पार’ हा मोदी-शहांचा नारा म्हणजे उसने अवसान आहे. त्यांना आपल्या कामांवर व नेतृत्व क्षमतेवर इतका विश्वास असता तर त्यांना असे हे फोडाफोडीचे खेळ करून सत्तेसाठी हपापलेपण दाखविण्याची काहीच गरज नव्हती”, असा टोला (Thackeray group criticizes Nitish Kumar) ठाकरे गटानं लगावला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.