रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरच्या किमतीने सोमवारी विक्रमी उच्चांक गाठला. बीएसईवर रिलायन्सचे शेअर्स ४.१९ टक्क्यांनी वाढून २, ८२४ रुपयांच्या नव्या उच्चांकावर पोहोचले आहेत. शेअर्स वाढीमुळे कंपनीचे मार्केट कॅप १९ लाख कोटी रुपयांच्या जवळ पोहोचले आहेत. असा रेकॉर्ड करणारी ही देशातली पहिली कंपनी आहे.
गेल्या एका महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर ९ टक्क्यांनी वाढले आहेत. तीन महिन्यांत २४ टक्के आणि एका वर्षात २० टक्के वाढले आहेत. या शेअरने तीन वर्षांत ५० टक्के परतावा दिला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीचे निकाल शुक्रवारी, १९ जानेवारीला जाहीर केले. डिसेंबर तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा (EBITDA) वार्षिक 16.7 टक्क्यांनी वाढून 44,678 कोटी रुपये झाला आहे. कंपनीच्या सर्व व्यवसाय विभागात वाढ झाली आहे.
(हेही वाचा – Aus Vs WI 2nd Test : दुसऱ्या कसोटीत विंडिजचा ऑस्ट्रेलियावर ८ धावांनी ऐतिहासिक विजय )
कंपनीच्या म्हणण्यानुसार, डिसेंबरपूर्वी तीन महिन्यांत एकत्रित नफा वार्षिक आधारावर ११ टक्क्यांनी वाढून १९,६४१ कोटी रुपये झाला आहे. या कालावधीत कंपनीचे उत्पन्न ३.२ टक्क्यांनी वाढून २.४८ लाख कोटी रुपये झाले आहे. जे एका वर्षापूर्वी याच तिमाहीत २.४१ लाख कोटी रुपये होते.
रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर…
टॉप १० कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, भारती एअरटेल, एलआयसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी आणि एसबीआय यांचा क्रमांक लागतो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community