Gyanvapi Case : ज्ञानवापी खटल्यात हिंदू पक्षाची याचिका : सील केलेल्या जागेचे सर्वेक्षण करण्याची मागणी

Gyanvapi Case : ज्ञानवापीचा ASI (Archaeological Survey of India) सर्वेक्षण अहवाल 25 जानेवारी रोजी रात्री उशिरा सार्वजनिक करण्यात आला. या अहवालानुसार आवारात मशिदीच्या आवारात भगवान विष्णू, गणेश आणि शिवलिंगाच्या मूर्ती सापडल्या आहेत.

263
Gyanvapi Case : ज्ञानवापी खटल्यात हिंदू पक्षाची याचिका : सील केलेल्या जागेचे सर्वेक्षण करण्याची मागणी
Gyanvapi Case : ज्ञानवापी खटल्यात हिंदू पक्षाची याचिका : सील केलेल्या जागेचे सर्वेक्षण करण्याची मागणी

उत्तर प्रदेशातील वाराणसी (Varanasi) येथील ज्ञानवापी मशिदीचा सर्व्हे करण्यासाठी हिंदू पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. (Gyanvapi Case) या याचिकेत ज्ञानवापीच्या आवारात सापडलेल्या शिवलिंगाचे सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरण; गणेश मारणे, विठ्ठल शेलारांसह 16 जणांवर मोक्का)

10 तळघरांमध्ये हिंदू मंदिराचे पुरावे आणि कलाकृती

या याचिकेत म्हटले आहे की, सर्वेक्षण करण्यासाठी शिवलिंगाभोवती असलेल्या कृत्रिम किंवा आधुनिक भिंती आणि मजले हटवावेत. शिवलिंगाला कोणतीही हानी न पोहोचवता संपूर्ण सीलबंद क्षेत्राचे शास्त्रोक्त सर्वेक्षण करण्यात यावे.

याचिकेत हिंदू पक्षाचे वकील विष्णु शंकर जैन (Vishnu Shankar Jain) यांनी ज्ञानवापी संकुलातील (Gyanvapi Mosque) सील केलेल्या वजुखान्याचे (स्नान जल टँक) सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. सील केलेल्या 10 तळघरांमध्ये हिंदू मंदिराचे पुरावे आणि कलाकृती आहेत, असे हिंदु पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. यापूर्वी 19 मे 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापीच्या सर्वेक्षणावर बंदी घातली होती.

(हेही वाचा – Aus Vs WI 2nd Test : दुसऱ्या कसोटीत विंडिजचा ऑस्ट्रेलियावर ८ धावांनी ऐतिहासिक विजय)

ASI सर्वेक्षण अहवाल 25 जानेवारी रोजी सार्वजनिक

ज्ञानवापीचा ASI (Archaeological Survey of India) सर्वेक्षण अहवाल 25 जानेवारी रोजी रात्री उशिरा सार्वजनिक करण्यात आला. या अहवालानुसार आवारात मशिदीच्या आवारात भगवान विष्णू, गणेश आणि शिवलिंगाच्या मूर्ती सापडल्या आहेत. संपूर्ण ज्ञानवापी संकुल मंदिराच्या रचनेवर उभे असल्याचे 34 पुरावे या याचिकेसोबत देण्यात आले आहेत. मशीद संकुलाच्या आत ‘महामुक्ती मंडप’ नावाचा दगडी स्लॅबही सापडला आहे.

पुरातत्व विभागाने अहवालामध्ये लिहिले की, ज्ञानवापीमध्ये एक मोठे हिंदू मंदिर होते. 17व्या शतकात जेव्हा औरंगजेब राज्य करत होता. त्या वेळी ज्ञानवापी रचना पाडण्यात आली. काही भाग बदलले केले. मूळ आकृतिबंध प्लास्टर आणि चुन्यासह लपविला होता.

839 पानांच्या अहवालात ASI ने ज्ञानवापीमधील प्रमुख ठिकाणांचा उल्लेख केला आहे. मशिदीच्या तळघरात मंदिराचा खांब सापडला आहे. तळघरामध्ये उपस्थित खंडित पुतळे, भिंतीवरील मूर्ती तोडल्याच्या खुणा, भिंतींवर कमळ, स्वस्तिक चिन्हे, पश्चिमेची भिंत नागर शैलीची असे पुरावे पुरातत्व विभागाला सापडले आहेत. (Gyanvapi Case)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.