Assassination of Gandhi : गांधींची हत्या; कुणाचा फायदा, कुणाचे षडयंत्र ? रणजित सावरकर यांचा पुस्तकातून विस्फोटक दावा

Assassination of Gandhi : दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात रणजित सावरकर यांच्या 'मेक शुअर गांधी इज डेड' या पुस्तकाचे प्रकाशन २९ जानेवारी रोजी करण्यात आले. या वेळी त्यांनी सावरकर हत्येविषयी अनेक विस्फोटक दावे केले.

453
Assassination of Gandhi : गांधींची हत्या; कुणाचा फायदा, कुणाचे षडयंत्र ? रणजित सावरकर यांचा पुस्तकातून विस्फोटक दावा
Assassination of Gandhi : गांधींची हत्या; कुणाचा फायदा, कुणाचे षडयंत्र ? रणजित सावरकर यांचा पुस्तकातून विस्फोटक दावा

गांधीजींच्या हत्येसाठी नथुराम गोडसे यांना फाशी देणे, हे गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच रामाच्या नावाखाली घडलेलं मोठं पाप आहे. जे पाप या पुस्तकाच्या माध्यमातून बाहेर येत आहे. प्रभु श्रीराम अयोध्येत आले आहेत. त्यांच्या येण्यासोबत हे पापही उघड झाले आहे, असे परखड प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी केले. (Assassination of Gandhi)

(हेही वाचा – जाणून घ्या ‘ही’ ९ योगासने आणि त्यांचे फायदे)

दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात रणजित सावरकर यांच्या ‘मेक शुअर गांधी इज डेड’ (Make sure Gandhi is dead) या पुस्तकाचे प्रकाशन २९ जानेवारी रोजी ‘इकॉनॉमिक टाइम्स’चे माजी संपादक, तसेच राजकीय तज्ज्ञ राजीव सोनी आणि प्रख्यात अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर (Virendra Ichalkaranjikar) यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी रणजित सावरकर बोलत होते.

पुरावे नष्ट करण्याचा सरकारचा प्रयत्न

गोडसेंना ‘मर्डर टू अटेंम्ट’साठी फाशी द्यायला हवी होती, हत्येसाठी नव्हे, असे स्पष्ट मत या वेळी रणजित सावरकर यांनी व्यक्त केले. या विषयावर पुस्तक लिहिण्याची प्रेरणा कशी मिळाली, ते सांगतांना रणजित सावरकर म्हणाले की, मुळात गांधींची (Mahatma Gandhi) हत्या झाली, तेव्हा परिस्थितीनुरूप अनेक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न तत्कालीन सरकारकडून करण्यात आला. असे अनेक बाबींवरून स्पष्ट झाले आहे.

Assassination of Gandhi : गांधींची हत्या; कुणाचा फायदा, कुणाचे षडयंत्र ? रणजित सावरकर यांचा पुस्तकातून विस्फोटक दावा
Assassination of Gandhi : गांधींची हत्या; कुणाचा फायदा, कुणाचे षडयंत्र ? रणजित सावरकर यांचा पुस्तकातून विस्फोटक दावा
हत्या दुसऱ्या कुणीतरी केली असण्याची शक्यता

गांधींसारख्या महत्त्वाच्या व्यक्तीला शासनाने योग्य सुरक्षा का पुरवली नाही, हे एक कोडे आहे. ते सोडविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कपूर कमिशनमध्ये अनेक चुकीच्या गोष्टी मांडण्यात आल्या होत्या. यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करण्यात आली होती. ती थांबविण्यासाठी हे पुस्तक लिहिण्यासाठी मी गेली सात वर्षे संशोधन करत आहे. तेव्हा माझ्या लक्षात आले की, नथुराम गोडसे (Nathuram Godse) यांना फक्त निमित्तमात्र करण्यात आले आहे. मुळात हत्या दुसऱ्या कुणीतरी केली असण्याची पूर्ण शक्यता आहे.

(हेही वाचा – Gyanvapi Case : ज्ञानवापी खटल्यात हिंदू पक्षाची याचिका : सील केलेल्या जागेचे सर्वेक्षण करण्याची मागणी)

गोडसेंच्या बंदुकीतील बुलेट होत्या त्यांच्याच पायाजवळ

नथुराम गोडसे बंदूक घेऊन जरी असले, तरी बुलेट त्यांच्या पायाजवळ पडलेल्या आढळून आल्या होत्या. यामुळे गांधी यांच्यावर दुरून कुणी दुसऱ्या व्यक्तीने गोळी चालविली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय नथुराम गोडसे यांना पुण्य कमवायचे होते; म्हणून त्यांनी गांधी हत्येची जबाबदारी स्वीकारली असू शकते. शिवाय गोडसे महात्मा गांधी हत्येच्या दोन दिवस आधी दिल्ली फिरत होते, तेव्हा त्यांना कुणीच थांबविले नव्हते. फक्त राजकीय फायदा उचलण्यासाठी गांधी हत्येचा उपयोग नेहरू यांनी करून घेतला, असे रणजित सावरकर पुढे म्हणाले.

कपूर अहवाल जनतेसाठी खुला करावा

पुस्तकाविषयी बोलताना सावरकर म्हणाले की, केंद्र सरकारने अजूनही कपूर अहवाल स्वीकारला वा नाकारला नाही. त्यामुळे तो अहवाल जनतेसाठी खुला करावा. यामुळे लोकांना सत्य परिस्थिती लक्षात येईल. हा केवळ सावरकरांचा विषय नाही, तर मानवी अधिकारांचा विषय आहे.

नथुरामला वाटलं की त्याने गोळ्या झाडल्या…

रणजित सावरकर या वेळी म्हणाले की, नथुराम गोडसे फक्त Rssचा स्वयंसेवक होता. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभेवर बंदी घालण्यात आली होती. ‘हे राम’ नाव घेऊन मोठे पाप दाबून ठेवण्यात आले होते. ते या पुस्तकातून समोर येईल. नथुराम गोडसेंच्या गोळ्यांनी गांधींचा मृत्यू झाला नाही. कर्नल तनेजा यांनी काळजीपूर्वक अहवाल बनवला आहे. नथुराम गोडसेचा समज झाला की, मीच गोळ्या मारल्या; पण खऱ्या गोळ्या इतरांनी मारल्या होत्या. तिथे २०० लोक होते. तिथे सुरक्षाव्यवस्था होती.

(हेही वाचा – Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरण; गणेश मारणे, विठ्ठल शेलारांसह 16 जणांवर मोक्का)

गांधी हत्येचे पुरावे दडपण्यात आले

नथुराम गोडसे गुन्हेगार नव्हते. ते पत्रकार होते. त्यामुळे त्यांचा निशाणा लागणे शक्य नव्हते. हे सगळे पुरावे पाहता गोडसेंनी गांधींना मारले नाही. गांधीजी दुसऱ्यांच्या गोळ्यांनी मेले. ते कोण होते, ते तपासायला हवे. यानंतर वल्लभभाई पटेल यांचा गट संपवण्यात आला. त्यानंतर आपण ग्रेट ब्रिटन सोबत व्यापार सुरू केला. १९७१ मध्ये हंटर विमान वापरले. पंडित नेहरूंना आणि ब्रिटनला याचा फायदा झाला. माझे आवाहन आहे, सरकारने यावर एक आयोग नेमावा. गांधी हत्येचे पुरावे दडपण्यात आले होते. त्यावर चौकशी सुरू करावी, असे रणजित सावरकर (Ranjit Savarkar) या वेळी म्हणाले.

पोलीस जे म्हणतील तेवढेच बरोबर असू शकत नाही – अ‍ॅडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर

वीरेंद्र इचलकरंजीकर (Virendra Ichalkaranjikar) या वेळी म्हणाले की, मालेगाव ब्लास्ट, अजमल कसाब या प्रकरणाचा तपास अनेक तपास यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात आला होता. नथुराम गोडसे यांना फाशी देण्यासाठी फक्त पोलिसांनी केलेल्या तपासावर विश्वास ठेऊन लगेच निर्णय घेण्यात आला होता. शिवाय गांधी हत्येचा तपास अत्यंत हलगर्जीपणाने करण्यात आला. गांधी हत्या प्रकरणात पोलीस जे म्हणतील तेवढेच बरोबर असू शकत नाही.

गुन्हेगारांना वाचविणारे कोण ? – राजीव सोनी

राजीव सोनी (Rajeev Soni) म्हणाले की, या पुस्तकाचे प्रकाशन ही एक आंदोलनाची सुरुवात आहे. गांधी हत्या गोडसे (Nathuram Godse) यांनी केलेली नसून ती वेगळ्या व्यक्तींनी केलेले षडयंत्र होते. या माध्यमातून खऱ्या गुन्हेगारांना वाचविण्यात आले आहे. यामुळे फायदा कुणाचा झाला हे बघावे लागेल. गुन्हेगारांना वाचविणारे ते लोक कोण होते, याचा शोध घेणे काळाची गरज असल्याचे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

या वेळी पुस्तकाचे संपादक मंगेश जोशी, धनंजय शिंदे, अनिल त्रिवेदी, दीपक कानूलकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी केले. (Ranjit Savarkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.