Hardik Pandya Recovers : मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने केली नेट्समध्ये गोलंदाजीला सुरुवात

आयपीएलपूर्वी मुंबई इंडियन्स संघाला मोठा दिलासा मिळाला आहे.

206
Hardik Pandya Recovers : मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने केली नेट्समध्ये गोलंदाजीला सुरुवात
Hardik Pandya Recovers : मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने केली नेट्समध्ये गोलंदाजीला सुरुवात
  • ऋजुता लुकतुके

यंदाचा आयपीएल हंगाम २२ मार्चला सुरू होईल असा अंदाज आहे. आणि त्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघासाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुंबई फ्रँचाईजीचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) घोट्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला असून त्याने नेट्समध्ये गोलंदाजीलाही सुरुवात केली आहे. अलीकडेच मुंबई इंडियन्सनी हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्स संघाकडून १५ कोटी रुपये मोजून खरेदी केलं आहे. इतकंच नाही तर रोहित ऐवजी त्याची कर्णधारपदी वर्णी लावली आहे. (Hardik Pandya Recovers)

हार्दिकची दुखापत जुनी आहे. ऑक्टोबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळताना त्याचा घोटा दुखावला होता. पुण्यात बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना फॉलोथ्रूमध्येच तो चेंडू अडवायला गेला. आणि तिथे त्याचा घोटा मुरगळला. सुरुवातीला साधी वाटलेली ही दुखापत मागचे ३ महिने हार्दिकला त्रास देतेय. तो विश्वचषकाला तर मुकलाच. शिवाय त्यानंतरची ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी-२० मालिका आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यालाही तो मुकला आहे. (Hardik Pandya Recovers)

आता टी-२० विश्वचषकापूर्वी स्वत:ची तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे आयपीएल (IPL) हे एकमेव व्यासपीठ आहे. आणि आता सरावासाठी त्याच्याकडे पुरेसा वेळ मात्र आहे. (Hardik Pandya Recovers)

नुकताच हार्दिकने आपला सराव करतानाचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आणि यात तो आपला भाऊ कृणाल पांड्याबरोबर गोलंदाजीचा सराव करताना दिसतोय. काही व्यायाम प्रकारांनंतर तो गोलंदाजीला सुरुवात करतो. आणि दिलासादायक गोष्ट म्हणजे गोलंदाजीची लयही त्याला सापडलेली दिसत आहे. (Hardik Pandya Recovers)

(हेही वाचा – Best Hotels In Pune: पुण्यातील दर्जेदार आणि लोकप्रिय हॉटेल्स कोणती? जाणून घ्या…)

‘या मैदानात आलो की मला बरं वाटतं. हे माझ्यासाठी मंदिरासारखं आहे. इथं मी इतक्या गोष्टी शिकलोय. १७ वर्षांपूर्वी क्रिकेटचा माझा प्रवासही इथंच सुरू झाला. माझ्याकडून जितकं म्हणून शक्य आहे ते मी आज करणार आहे. आणि नेहमीच करत राहीन,’ असं हार्दिक या व्हिडिओत म्हणतोय. (Hardik Pandya Recovers)

हार्दिक पांड्याला सुरुवातीला मुंबई इंडियन्सच्या चाहता वर्गालाही खुश करायचंय. कारण, रोहित शर्माला या पदावरून हटवलेलं त्यांना मान्य नाहीए. आणि सोशल मीडियावर त्याचे पडसाद आधीच उमटले आहेत. (Hardik Pandya Recovers)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.