Online Bus Booking : ऑनलाईन ॲपवर सांगितले जाते, तशा सुविधा खरेच मिळतात का ? बुकिंग करतांना खात्री करा !

219
Online Bus Booking : ऑनलाईन ॲपवर सांगितले जाते, तशा सुविधा खरेच मिळतात का ? बुकिंग करतांना खात्री करा !
Online Bus Booking : ऑनलाईन ॲपवर सांगितले जाते, तशा सुविधा खरेच मिळतात का ? बुकिंग करतांना खात्री करा !

ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन बुकिंगकडे सध्या अनेकांचा कल वाढत आहे. वेगवेगळ्या ऑफर्स आणि घरपोच डिलिव्हरी यांमुळे अनेक जण ई-कॉमर्स वेबसाईटला प्राधान्य देतात. रेल्वे, बसेस, चित्रपटांची ऑनलाईन तिकिटे बुकिंगसाठी ई-कॉमर्स बाजारात मोठ्या प्रमाणात अप्लिकेशन आले आहे. (Online Bus Booking) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या अप्लिकेशनवर अनेक प्रलोभने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. याचा प्रत्यय खुद्द पुण्यातील एका ज्येष्ठ पत्रकार यांना आला आहे.

(हेही वाचा – World’s Richest Man : लुई व्हितॉचे बर्नार्ड आरनॉल्ट यांनी पुन्हा टाकलं एल़ॉन मस्क यांना मागे)

एस.एम. देशमुख यांनी शेअर केला अनुभव

पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त व राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य एस.एम. देशमुख (SM Deshmukh) यांनी पुण्याहून पणजीला जाण्यासाठी एका ऑनलाईन ॲपवरून खाजगी बसचे (इंटरसिटी ट्रॅव्हल्स) तिकीट खरेदी केले होते. तिकीट खरेदी करतांना ॲपवर बुकिंग करण्यात आलेल्या बसमध्ये असलेल्या सुविधेबाबत माहिती देण्यात आली होती. तिकीट बुक करतांना त्यांना ही बस २+१ (३) वातानुकूलित, स्लीपर सोबत वॉशरुम, भारतबेंज, फुल्ल एअर सस्पेंन्शन असे सांगण्यात आले होते. देशमुख यांच्याकडून पुणे ते पणजी दरम्यानचे प्रवासभाडे अठराशे रुपये आकारण्यात आले होते.

भंगारात काढावी, अशी बसची स्थिती

देशमुख यांना पुणे ते पणजी असा प्रवास करतांना इंटरसिटी ट्रॅव्हल्स (Intercity Travels) बसमधून प्रवास करतांना जो अनुभव आला, तो त्यांनी अनुभव फेसबूकवर व्यक्त केला आहे. देशमुख यांच्या म्हणण्यानुसार तिकीट बूक करतांना त्या बसमध्ये काय सवलती असतील, याबाबत सांगण्यात आलेल्या सवलतीपैकी केवळ वातानुकूलित यंत्रणा आणि आसन व्यवस्था होती. बसला अजिबात सस्पेन्सन नव्हते, तर वॉशरूम देखील नव्हते, बस पूर्णपणे भंगारात काढावी, अशी तिची अवस्था होती. पुणे ते पणजी प्रवासादरम्यान संपूर्ण शरीराची हाडे खिळखिळी झाली, अशी प्रतिक्रिया देशमुख यांनी हिंदुस्थान पोस्टशी बोलतांना दिली.

(हेही वाचा – Gyanvapi Case : ज्ञानवापी खटल्यात हिंदू पक्षाची याचिका : सील केलेल्या जागेचे सर्वेक्षण करण्याची मागणी)

ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करणार

फसवणूक झाल्यानंतर देशमुख यांनी ऑनलाईन तक्रार केल्यानंतर परिवहन विभागाने (Department of Transport) या तक्रारीची दखल घेत या ट्रॅव्हल कंपनीला १५ हजार ७५० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या ट्रॅव्हल्स कंपनीला ठोठावण्यात आलेला दंड हा पुरेसा नसून या कंपनीच्या विरोधात मी ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.

ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी करतांना किंवा ऑनलाईन बुकिंग करतांना कंपन्यांच्या प्रलोभनाला अथवा भूल-थापांना बळी न पडता खात्री करून घ्यावी. त्यानंतरही फसवणूक झाल्यास शासकीय तक्रार निवारण पोर्टल इनग्राम (Integrated Grievance Redressal system) किंवा Consumers helpline .Gov.in किंवा राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन नंबर 1800-11-4000 आणि 14404 याच्यावर आपल्या ऑनलाईन तक्रारी दाखल कराव्यात, अशी माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली. (Online Bus Booking)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.