CJI Scolds Advocate : हा रेल्वे प्लॅटफॉर्म नाही; सरन्यायाधिशांनी वकिलाला का फटकारले ?

CJI Scolds Advocate : हा रेल्वे प्लॅटफॉर्म नाही की तुम्ही कोणत्याही ट्रेनमध्ये येऊन चढू शकता. कोर्टरूममध्ये कसे वागावे, हे प्रथम वरिष्ठांकडून शिका, असे सरन्यायाधीश (CJI) धनंजय चंद्रचूड यांनी वकिलाला फटकारले.

280
CJI Scolds Advocate : हा रेल्वे प्लॅटफॉर्म नाही; सरन्यायाधिशांनी वकिलाला का फटकारले ?
CJI Scolds Advocate : हा रेल्वे प्लॅटफॉर्म नाही; सरन्यायाधिशांनी वकिलाला का फटकारले ?

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश (CJI) धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी सोमवारी (29 जानेवारी) कोर्टरूममध्ये गैरवर्तन केल्याबद्दल वकिलाला फटकारले. ते वकील त्याची पाळी येण्यापूर्वीच अचानक कोर्टरूममध्ये उभे राहिले आणि वाद घालू लागले. त्यानंतर सरन्यायाधिशांनी तिला सुनावले. (CJI Scolds Advocate)

(हेही वाचा – World’s Richest Man : लुई व्हितॉचे बर्नार्ड आरनॉल्ट यांनी पुन्हा टाकलं एल़ॉन मस्क यांना मागे)

प्रथम वरिष्ठांकडून शिका

सरन्यायाधीश म्हणाले, हा रेल्वे प्लॅटफॉर्म नाही की तुम्ही कोणत्याही ट्रेनमध्ये येऊन चढू शकता. कोर्टरूममध्ये कसे वागावे, हे प्रथम वरिष्ठांकडून शिका. (supreme court)

वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते की, त्यांनी न्यायिक सुधारणांसाठी जनहित याचिका दाखल केली आहे. यावर तातडीने सुनावणी व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे. हे प्रकरण आजच्या सुनावणीच्या यादीत नाही.

वेळी सरन्यायाधीश चंद्रचूड संतापले कोर्टरूम (Courtroom) हा रेल्वेचा प्लॅटफॉर्म नाही, जिथे तुम्ही कोणत्याही ट्रेनमध्ये चढू शकता, अशा शब्दांत त्यांनी वकिलाला फटकारले. त्यानंतरही वकील आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले. ‘मी न्यायव्यवस्थेच्या विरोधात नाहीत, पण त्यात सुधारणा हवी आहे’, असे ते म्हणाले.

(हेही वाचा – Ranking the Top Engineering Colleges in Pune : जाणून घ्या पुण्यातील टॉप १० इंजिनिअरिंग कॉलेजबद्दल)

यापूर्वीही केली वकिलांची कानउघाडणी

सरन्यायाधिशांनी वकिलाला विचारले की, ते कुठे प्रॅक्टिस करतात. वकिलाने सांगितले की, तो उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालयात प्रॅक्टिस करतात.

यानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, तुम्ही (वकील) वरिष्ठ वकिलांसोबत काम केले पाहिजे. ते तुम्हाला कोर्टरूमचे शिष्टाचार शिकवू शकतील.

यापूर्वीही सरन्यायाधीश वकिलांवर रागावले आहेत. ऑक्टोबर 2023 मध्ये मोबाईलवर बोलणाऱ्या वकिलाला त्यांनी विचारले होते, ”हा बाजार आहे का ?” मार्च 2023 मध्येही मोठ्या आवाजात बोलणाऱ्या वकिलाला ते म्हणाले होते, ”गप्प बसा, नाहीतर कोर्टातून बाहेर जा.” (CJI Scolds Advocate)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.