-
ऋजुता लुकतुके
रिझर्व्ह बँकेनं रविवारी फेब्रुवारीतील सुट्यांची यादी जाहीर केली आहे. आणि ती पाहता फेब्रुवारी महिन्यात बँक कर्मचाऱ्यांना ११ सुट्या मिळतील असं दिसतंय. त्यामुळे ग्राहकांना बँकेची काम नियोजनपूर्वक करावी लागणार आहेत. या सुट्यांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार तसंच रविवारच्या सुट्याही आहेत. पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी बँका सुरू राहतील. (Bank Holidays in February 2024)
यातील काही सुट्या या ठरावीक राज्यांमध्येच पाळण्यात येतात. रिझर्व्ह बँक सुट्यांची वर्गवारी तीन प्रकारात करत असते. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट अंतर्गत येणाऱ्या सुटया, बँकांसाठीचा रिअलटाईम ग्रॉस सेटलमेंट दिवस आणि बँकेचे लेखा परीक्षण पूर्ण करण्याचा दिवस अशा या तीन सुट्या आहेत. राष्ट्रीय सणाच्या दिवशी देशभर बँक सेवा बंद राहते. (Bank Holidays in February 2024)
फेब्रुवारीतील बँकांच्या सुट्या,
४ फेब्रुवारी – रविवार
१० फेब्रुवारी – दुसरा शनिवार/गँगटोकमध्ये लोसार महोत्सव
१४ फेब्रुवारी – वसंत पंचमी, सरस्वती पूजन (कोलकाता, आगरताला आणि भुवनेश्वर इथं बँका बंद)
१५ फेब्रुवारी – लुई एन्गाई नी (इम्फाळमध्ये बँका बंद राहतील)
१८ फेब्रुवारी – रविवार
१९ फेब्रुवारी – (छत्रपती शिवाजी महाराज जयंती. नागपूर, बेलापूर आणि मुंबईत बँका बंद)
२० फेब्रुवारी – मिझोराममध्ये राज्य दिवसाची सुटी
२४ फेब्रुवारी – दुसरा शनिवार
२५ फेब्रुवारी – रविवार
२६ फेब्रुवारी – नायोकुम – इटानगरमध्ये सुटी
Join Our WhatsApp Community