Kalyan – Dombivli Water Cut : कल्याण – डोंबिवलीमध्ये दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार

कल्याण पूर्व आणि पश्चिम, डोंबिवली पूर्व आणि पश्चिम, टिटवाळा, वडवली भागाचा पाणीपुरवठा आज पूर्ण बंद राहणार आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

276
Kalyan - Dombivli Water Cut : कल्याण - डोंबिवलीमध्ये दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार

कल्याण – डोंबिवलीकरांना (Kalyan – Dombivli Water Cut) आज पाणी जपून वापरावे लागणार आहे. कारण कल्याण-डोंबिवलीचा पाणीपुरवठा (Kalyan Dombivli Water Supply) आज म्हणजेच मंगळवार ३० जानेवारी रोजी बंद राहणार आहे. या दोन्ही शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मोहिली, बारावे, नेतिवली, टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रांच्या दुरुस्तीचं काम आज करण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, ग्रामीण भागाचा पाणीपुरवठा आज सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत बंद राहणार आहे.

(हेही वाचा – ICC Lifts Ban on Sri Lanka : आयसीसीने श्रीलंकन क्रिकेट मंडळावरील बंदी हटवली)

पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन –

कल्याण पूर्व आणि पश्चिम, डोंबिवली पूर्व आणि पश्चिम, टिटवाळा, वडवली भागाचा पाणीपुरवठा आज पूर्ण बंद राहणार आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. म्हणूनच नागरिकांनी एक दिवस पुरेल एवढा पाणीसाठा (Kalyan – Dombivli Water Cut) करून ठेवावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Bank Holidays in February 2024 : फेब्रुवारीत ‘या’ दिवशी राहणार बँका बंद)

‘या’ भागांचा पाणीपुरवठा आज बंद

कल्याण डोंबिवली शहरांना दररोज सुमारे ३५० हून अधिक दशलक्ष लीटर पाणीपुरवठा (Kalyan – Dombivli Water Cut) विविध स्रोतांमधून केला जातो. डोंबिवली शहराला नेतिवली टेकडीवरील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. तर टिटवाळा, कल्याणसाठी स्वतंत्र जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. या स्रोतांमधून मोहने, आंबिवली, वडवली परिसराला पाणीपुरवठा केला जातो. या सर्व भागाचा पाणीपुरवठा या कालावधीत बंद राहणार आहे. (Kalyan – Dombivli Water Cut)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.