- ऋजुता लुकतुके
इंग्लंड विरुद्धच्या हैद्राबाद कसोटीत भारताचा तेज गोलंदाज जसप्रीत बुमराला सामनाधिकाऱ्यांनी वर्तणुकीसाठी ताकीद दिली आहे. आणि गैरवर्तणुकाचा एक डीमेरिट गुणही बहाल केला आहे. जसप्रीत बुमराने ऑली पोपला धाव घेताना अडथळा निर्माण केला होता. आणि मग पोपला अयोग्य पद्धतीने स्पर्षही केला होता. (Ind vs Eng 1st Test)
आयसीसीच्या आचारसंहितेनुसार हा पहिल्या प्रकारचा गुन्हा आहे. ताकीद देण्याबरोबरच सामनाधिकाऱ्यांनी त्याला एक डिमेरिट गुण बहाल केला आहे. आयसीसी कसोटी अजिंक्यपदाच्या हंगामात २ वर्षांसाठी हे गुण लागू असतील. (Ind vs Eng 1st Test)
‘इंग्लंडचा दुसरा डाव सुरू असताना ८१ व्या षटकात हा प्रकार घडला. बुमरा गोलंदाजी करत होता. पोपने त्याचा चेंडू तटवल्यावर एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. बुमराचा चेंडू टाकून फॉलो-थ्रूही संपला होता. पण, तरीही तो पोपच्या मार्गात उभा राहिला. त्यामुळे पोपला त्याचा धक्काही बसला,’ असं आयसीसीने पत्रकात म्हटलं आहे. (Ind vs Eng 1st Test)
(हेही वाचा – ‘Virat Kohli Spat on Me’ : दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डीन एल्गरने विराट कोहली त्याच्यावर थुंकल्याची आठवण काढली आहे)
खेळाडूंसाठी आणि खेळाडूंच्या सपोर्ट स्टाफसाठी असलेल्या आचारसंहितेचा हा भंग आहे.
The Code of Conduct breach occurred during the fourth day of #INDvENG first Test in Hyderabad 👀
Details 👇https://t.co/PPjnAhcBAY
— ICC (@ICC) January 29, 2024
इंग्लंडने या कसोटीत भारतीय संघाचा २८ धावांनी पराभव केला. बुमराच्या वर्तनाविषयी मैदानातील पंच पॉल रायफेल, ख्रिस गॅफनी आणि तिसरे पंच मरेस इरासमस तर चौथे पंच रोहन पंडित यांनी तक्रार केली होती. त्यानंतर सामनाधिकारी वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार आणि सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी ही कारवाई केली. (Ind vs Eng 1st Test)
बुमराने हा गुन्हा माफ केला आहे. त्यामुळे या प्रकरणी पुढे चौकशीची गरज पडली नाही. डिमेरिटचे असे २ गुण कमी झाल्यावर त्या खेळाडूवर पुढील कसोटीसाठी निलंबनाची कारवाई होऊ शकते. (Ind vs Eng 1st Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community