मृत्यूचा आकडाही घटतोय : दिवसभरात २,५५४ रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू

मुंबईत रुग्ण दुपटीचा दर सोमवारी १११ दिवसांवर आला होता, तो वाढून मंगळवारी ११६ दिवसांवर पोहोचला आहे.

94

सोमवारी, ३ मे रोजी दिवसभरात जिथे २,६६२ रुग्ण आढळून आले होते, तिथे मंगळवारी २,५५४ रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झालेली असतानाच दुसरी आनंदाची बातमी म्हणजे मृत्यूचा आकडाही कमी होताना दिसत आहे. सोमवारी दिवसभरात जिथे ७८ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तिथे मंगळवारी, ४ मे रोजी ६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे घटणारी रुग्ण आणि मृत्यू संख्या मुंबईकरांच्या मनातील भीती घालवणारी ठरणार आहे.

रुग्ण दुपटीचा दर ११६ दिवसांवर पोहोचला!

रविवारी ३,६७२ रुग्ण, सोमवारी २,६६२ रुग्ण आणि मंगळवारी २,५५४ एवढे आढळून आले. तर मंगळवारी दिवसभरात एकूण ५ हजार २४० रुग्ण बरे होवून घरी परतले. मात्र, मंगळवारपर्यंत ५१,३८० रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरु होते. तर दिवसभरात ६२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये ३८ रुग्ण हे दीर्घकालीन आजारी होते. तर यामध्ये ३९ पुरुष व २३ महिला रुग्णांचा समावेश होता. यातील ५ रुग्ण हे ४० वयोगटाच्या खालील आहेत. तर ३७ रुग्णांचे वय हे ६० वर्षांवरील होते. आणि ४० ते ६० वयोगटातील मृतांचा आकडा हा २० एवढा होता. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर सोमवारी १११ दिवसांवर आला होता, तो वाढून मंगळवारी ११६ दिवसांवर पोहोचला आहे.

(हेही वाचा : मालाडला सहाय्यक आयुक्त द्या, नाहीतर कोर्टात जाऊ!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.