गुन्हेगारांवर वचक ठेवणे आणि कायद्याचे पालन न करणाऱ्यांना शिक्षा करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. पोलीस रात्रंदिवस आपल्यासाठी कर्तव्य बजावतात, पण काही कायद्याच्या रक्षकांनीच चोरी केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे आणि तीसुद्धा पोलीस स्थानकातच.
पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ही घटना घडली. गुन्ह्यातील जप्त केलेल्या दुचाकी पोलिसांनी विकून टाकल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यावर एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. या आरोपीची कसून चौकशी केली असता एक धक्कादायक माहिती समोर आली. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्माचाऱ्यांनी काही दुचाकी परस्पर विकायला सांगितले, अशी कबुली या आरोपीने दिली. या गाड्या स्क्रॅपच्या असल्याचे सांगत पोलीस कर्मचाऱ्याने त्या बाजारात विकायला सांगितले असल्याची माहिती आरोपीने दिली.
(हेही पहा – Sarkari Education: सध्याच्या स्पर्धात्मक नोकरीच्या जगात सरकारी शिक्षणाचे महत्त्व काय? जाणून घ्या… )
स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला हे कृत्य करण्यास भाग पाडले. वेळोवेळी या पोलीस कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, मात्र ते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पुणे शहर पोलीस दलातील या ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. सोमवारी (२९ जानेवारी) या ४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची ऑर्डर पोलीस उपायुक्त यांनी जाहीर केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community