Naxalites Attack : छत्तीसगडमध्ये CRPF कॅम्पवर नक्षलवाद्यांचा हल्ला; 3 जवान हुतात्मा

302
Naxalites Attack : छत्तीसगडमध्ये CRPF कॅम्पवर नक्षलवाद्यांचा हल्ला; 3 जवान हुतात्मा
Naxalites Attack : छत्तीसगडमध्ये CRPF कॅम्पवर नक्षलवाद्यांचा हल्ला; 3 जवान हुतात्मा

छत्तीसगडच्या (Chhattisgarh) सुकमा-बिजापूर जिल्ह्याचा सीमावर्ती भाग टेकलगुडेम गावात नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. सीआरपीएफ (CRPF) कॅम्पवर झालेल्या हल्ल्यात 3 जवान हुतात्मा झाले आहेत, तर 14 जवान जखमी झाले आहेत. (Naxalites Attack)

(हेही वाचा – Rafael Nadal Racquet : राफेल नदालच्या फ्रेंच ओपन जिंकून दिलेल्या रॅकेटला मिळाले १.११ लाख अमेरिकन डॉलर)

सुरक्षा शिबिरानंतर केला हल्ला

जखमी जवानांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हल्ल्याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात फोर्स दाखल झाली आहे. या हल्ल्यानंतर घटनास्थळी फौजफाटा तैनात करण्यात आला आहे, त्याचसोबत परिसराची नाकेबंदी करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला. (Naxal Attack on CRPF)

30 जानेवारी रोजी सुकमा पोलीस स्टेशन (Sukma Police Station) जगरगुंडा परिसरात नक्षलवादी कारवायांना आळा घालण्यासाठी आणि परिसरातील लोकांना मदत करण्यासाठी सुरक्षा शिबिर लावण्यात आले होते. यानंतर सीआरपीएफचे कोब्रा सैनिक जोनागुडा-अलीगुडा परिसरात शोध मोहीम राबवत होते.

(हेही वाचा – Pune Crime : पोलीस स्थानकातच चोर-पोलिसाचा खेळ, पुण्यातील ४ पोलीस निलंबित, वाचा नेमकं काय घडलं…)

या वेळी नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर बेछूट गोळीबार केला होता. यामध्ये सुरक्षा दलांनीही नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर नक्षलवादी जंगलाच्या आड पळून गेले. या हल्ल्यात 3 जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले आहे. (Naxalites Attack)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.