पुणे (Pune) जिल्ह्यातील ग्रामीण परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त वावर अनेकदा असतो. येथील मुळशी तालुक्यामध्ये एका व्यक्तीच्या अंगणात मध्यरात्री बिबट्या घुसला होता, मात्र या बिबट्याला चक्क पाळीव कुत्र्याने पळवून लावलं. या घटनेचा व्हिडियो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
जिल्ह्यातील मुळशीमधील कासारसाई येथे राहणाऱ्या शांताराम लेणे यांच्या अंगणात २८ जानेवारीच्या मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास एका घराच्या अंगणात बिबट्याने शिरकाव केला होता, मात्र लेणे यांचा पाळीव कुत्रा भोलू अंगणात असल्याने त्याने शिताफीने बिबट्याला पळवून लावलं.
(हेही वाचा – Manoj Jarange-Patil: १० फेब्रुवारीला पुन्हा उपोषण करणार, मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारला इशारा)
मध्यरात्रीच्या सुमारास सर्व घरात झोपलेले असताना अचानक अंगणात एक बिबट्या आला. त्यावेळी शांताराम यांचा पाळीव कुत्रा भोलू घराच्या बाहेर रखवालदारी करत होता. बिबट्याला अंगणात पाहताच भोलू जोरजोरात भुंकू लागला. बिबट्या भोलूच्या समोर येऊन उभा राहिला. तरीही भोलू बिबट्याला न घाबरता त्याला पाहून जास्तच भुंकू लागला. अखेर कुत्र्याच्या भुंकण्यामुळे भक्ष्याच्या शोधात असणाऱ्या बिबट्याला माघारी फिरावे लागले. भोलूची हिंमत, धैर्यामुळे त्याने बिबट्याशी सामना केला आणि त्याला परतवून लावलं. ही घटना शांताराम लेणे यांच्या घराजवळील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली. सध्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पाळीव कुत्रा भोलूची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.
ग्रामस्थांकडून पिंजरा लावण्याची मागणी
मुळशी तालुका हा बहुतांश शेती आणि जंगल परिसरात आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर जंगली प्राणी, बिबट्या, वाघ, सिंह मोकळ्या परिसरात फिरताना मध्यरात्रीच्या सुमारास आढळतात. शांताराम लेणे यांच्या अंगणात आलेल्या बिबट्याला तात्काळ वनविभागाकडून पकडण्यात यावे, यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात तसेच त्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community