Anil Babar Death: शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं आकस्मिक निधन

अलीकडेच सांगलीत झालेल्या एका विशेष कार्यक्रमाला अनिल बाबर उपस्थित होते.

364
Anil Babar Death: शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं आकस्मिक निधन
Anil Babar Death: शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं आकस्मिक निधन

शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर (Anil Babar Death) यांचं आज आकस्मिक निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. सांगली जिल्ह्यातील खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात ते आमदार होते. न्यूमोनिया झाल्याने काल दुपारी अनिल बाबर यांना सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

सांगलीतील खानापूर तालुक्यातील गार्डी या गावी अनिल बाबर यांचा जन्म झाला. त्यांनी सरपंच पदापासून राजकारणाच्या विविध पायऱ्या पादाक्रांत केल्या. जिल्हा परिषद सदस्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. जुन्या पिढीसोबतच नवीन पिढीशी ते सहज मिसळून जात असत. गेल्यावर्षी झालेल्या राजकीय उलथापालथीत ते अचानक नॉट रिचेबल झाले आणि शिंदे गटात ते सहभागी झाले.

(हेही वाचा – RFID System: वैष्णोदेवी मंदिरात भाविकांच्या वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी ‘ही’ यंत्रणा कार्यान्वित होणार, जाणून घ्या…)

राजकीय कारकीर्द…

अलीकडेच सांगलीत झालेल्या एका विशेष कार्यक्रमाला अनिल बाबर उपस्थित होते. शरद पवारही त्या कार्यक्रमाला आले होते. अनिल बाबर त्या ठिकाणी आले, त्यावेळी जयंत पाटील यांनी त्यांना बसण्यासाठी जागा दिली. 7 जानेवारी 1950 रोजी अनिल बाबर यांचा जन्म झाला. त्यांची राजकीय कारकीर्द तितकीच मोठी आहे. 1972 साली वयाच्या 22 व्या वर्षापासून त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा प्रवास होता. सर्वातआधी ते 1990 साली आमदार म्हणून ते विधानसभेवर निवडून गेले. 1982 ते 1990 खानापूर पंचायत समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. पश्चिम महाराष्ट्रात अनिल बाबर यांची पाणीदार आमदार अशी ओळख आहे. खानापूर-आटपाडी हा मतदारसंघाला दुष्काळाचा शाप आहे. या भागासाठी जायकवाडी प्रकल्पातून पाणी खेचून आणता येईल, यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.