पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) (PM Modi) ३ वेळा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. जानेवारीमध्ये नाशिक (Nashik), मुंबई (Mumbai) आणि सोलापूर (Solapur) दौऱ्यावर पंतप्रधान आले होते.
लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात ते तीन वेळा महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. आता फेब्रुवारीमध्येही ते तीन वेळा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्यामध्ये एक दौरा पश्चिम महाराष्ट्रात असेल तर दोन वेळा ते विदर्भात येणार असल्याचं समजतेय. मात्र, अद्याप या दौऱ्याबाबत निश्चिती नाही.
(हेही वाचा – PTI Campaign Rally: पाकिस्तानात पीटीआयच्या प्रचारसभेत स्फोट, 4 ठार, 6 जखमी )
दोन वेळा विदर्भात येणार –
– फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी २ वेळेला विदर्भाच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. ११ फेब्रुवारीच्या सुमारास ते यवतमाळमध्ये महिला बचत गटाच्या मेळाव्याला संबोधित करतील, अशी शक्यता आहे तसेच ते फेब्रुवारीचे तिसऱ्या आठवड्यात नागपुरात भाजपच्या अनुसूचित जाती आघाडीतील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करतील अशी माहिती समोर आली आहे.
– भाजपच्या एससी सेल (SC Cell)च्या देशभरातील सुमारे 25, 000 पदाधिकाऱ्यांचा खास मेळावा/सभा नागपुरात पार पडणार असून मोदी या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी भाजपने पक्षाच्या वेगवेगळ्या आघाडी ( Cell)च्या खास सभा वेगवेगळ्या शहरात घेण्याचे ठरवले आहे. त्याअंतर्गत भाजपच्या अनुसूचित जाती आघाडी खास सभा नागपुरात होणार आहे.
१९ फेब्रुवारीला पुण्यात…
मोदी १९ फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहितीही समोर आली आहे. प्रशासनाकडून यासंदर्भात तयारीही सुरू आहे. यावळी त्यांच्या हस्ते पुणे एअरपोर्ट टर्मिनल आणि मेट्रोच्या मार्गिकेचे उद्घाटन होणार असून ते शिवनेरी किल्ल्यावरही जाण्याची शक्यता आहे.
हेही पहा –