मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (Financial Offenses) (EOW)बिल्डर ललित टाकचंदानी (Lalit Takchandani) याला मंगळवारी, ९ तासांच्या चौकशीनंतर अटक केली. शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि सुप्रीम कन्स्ट्रक्शन्सचे संचालक असलेल्या टेकचंदानी (Lalit Takchandani) यांच्याशी संबंधित विविध ठिकाणी गेल्या शुक्रवारी केलेल्या छापेमारीनंतर ही अटक करण्यात आली.
टेकचंदानींविरुद्ध ५ गुन्हे दाखल असून नुकताच चेंबूर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झालेला होता.या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. आर्थिक गुन्हे शाखेने चेंबूर, बीकेसी आणि टेकचंदानी यांचे निवासस्थान आणि कार्यालयासह इतर ठिकाणी गेल्या आठवड्यात छापेमारी केली होती. या छापेमारीत पोलिसांना काही कागदोपत्री पुरावा मिळून आले होते.
(हेही वाचा – Bmc Planing Department: शिवणयंत्र, घरघंटी आणि मसाला कांडप यंत्र वाटप, अर्थसहाय्य रक्कम निश्चितीवरच शंका)
एका विशिष्ट गुन्ह्यात १६० घर खरेदी करणाऱ्यांची जवळपास ४४ कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले. ललित टेकचदानी विरोधात नवीमुंबईतील तळोजा येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. बुधवारी बिल्डरला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community