Indigo Scam : दिल्लीत इंडिगो ‘ट्रेनीने’ केलेल्या घोटाळ्यात प्रवाशाने गमावली ७२,००० रुपयांची तिकिटं

एका फोनवर पीएनआर नंबर शेअर केल्यावर प्रवाशाच्या खात्यातील तिकिटंच गायब झाली.

274
Indigo Scam : दिल्लीत इंडिगो ‘ट्रेनीने’ केलेल्या घोटाळ्यात प्रवाशाने गमावली ७२,००० रुपयांची तिकिटं
Indigo Scam : दिल्लीत इंडिगो ‘ट्रेनीने’ केलेल्या घोटाळ्यात प्रवाशाने गमावली ७२,००० रुपयांची तिकिटं
  • ऋजुता लुकतुके

नवी दिल्लीजवळ नॉयडाला (Indigo Scam) राहणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने (Software Engineer) आपल्या कुटुंबीयांसाठी घेतलेली त्रिवेंद्रम ते दिल्ली प्रवासाची ८ तिकिटं अचानक रद्द झाली. आणि यात त्याचं ७२,००० रुपयांचं नुकसान झालं आहे. स्वत:ला इंडिगो कंपनीचा ट्रेनी म्हणवणाऱ्या एका व्यक्तीने या अभियंत्याला फोन केला आणि त्यांच्याकडून तिकिटाचा पीएनआर क्रमांक घेतला. आणि त्यानंतर काही मिनिटांतच त्यांची तिकिटं रद्द झाली.

निशित चतुर्वेदी असं या अभियंत्याचं नाव आहे. आणि ते सिस्को कंपनीत काम करतात. ही घटना ७ जानेवारीची आहे. ‘मला वेब चेक-इन करताना हव्या तशा सीट मिळत नव्हत्या. म्हणून मी कंपनीला ट्विटरवर संपर्क साधला. काही वेळात मला कंपनीकडून दिव्यांशी नावाच्या एका ट्रेनी व्यक्तीचा रिप्लायही आला. तिच्या सांगण्यावरून मी तिला तिकिटाचा पीएनआर नंबर दिला. हे सगळं मध्यरात्री १.०५ च्या दरम्यान घडलं. आणि पुढे १.३८ मिनिटांनी मला थेट तिकिटं रद्द झाल्याचाच मेल आला.,’ असं निशित यांनी मनीकंट्रोल वेबसाईटशी बोलताना सांगितलं.

(हेही वाचा – Narendra Modi: खासदारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा लाभ घ्यावा आणि सकारात्मक पाऊल टाकावे – पंतप्रधान)

क्लिअरट्रिप या ॲपवरून त्यांनी तिकिटं बुक केली होती. आणि त्यांनी तिकिटं रद्द झाल्याचं निशित यांना सांगितलं. निशित यांनी या गोष्टीचा इंडिगो एअरलाईन्स आणि क्लिअरट्रिप अशा दोघांकडे पाठपुरावा केला. त्यानंतर इंडिगो एअरलाईन्सने त्यांना दिलेलं उत्तर धक्कादायक होतं. ‘इंडिगोच्या म्हणण्यानुसार, माझा फोन क्रमांक आणि ईमेल बदलण्यात आला होता. हा सुरक्षिततेचा भंग होता. पण, इंडिगोचं उत्तर एकच होतं की, ते चौकशी करतील आणि कंपनीची चूक असेल, तर परतावा देतील,’ निशित यांनी पुढे सांगितलं.

निशित आणि त्यांच्या कुटुंबीयांना ती रात्र त्रिवेंद्रम विमानतळावर काढावी लागली. पण, त्यांनी इंडिगोकडे पाठपुरावा करणं सोडलं नाही. शेवटी पहाटे पाच वाजता इंडिगोनं आपली चूक मान्य केली. आणि तिकिटाची पूर्ण रक्कम निशित यांना देऊ केली. इंडिगो विमान कंपनीच्या तिकिटात फेरफार झाल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी बंगळुरुमघील एका ३२ वर्षीय महिलेनं कंपनीकडे अशीच तक्रार केली होती. त्यामुळे सायबर चोरांनी ऑनलाईन विमान तिकिटांनाही आता लक्ष्य केलेलं दिसतंय.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.