Ind vs Eng 2nd Test : राहुल, जडेजाच्या दुखापतीमुळे भारतीय संघासमोर संघ निवडीचा प्रश्न

जाडेजा आणि के एल राहुलच्या दुखापतीमुळे भारताच्या मधल्या फळीला खिंडार पडलं आहे. 

221
Ind vs Eng 2nd Test : राहुल, जडेजाच्या दुखापतीमुळे भारतीय संघासमोर संघ निवडीचा प्रश्न
  • ऋजुता लुकतुके

इंग्लिश बॅझ-बॉल रणनितीसमोर फिकी पडलेली भारतीय फिरकी आणि विराट कोहलीची (Virat Kohli) अनुपस्थिती यामुळे भारतीय संघासमोर (Indian team) आधीच आव्हानं उभी असताना, पहिल्याच कसोटीत के एल राहुल (KL Rahul) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांना दुखापत झाली आहे. इंग्लंडचा माजी फिरकीपटू माँटी पानेसरने तर इंग्लंड ही मालिका ५-० ने जिंकले, अशी गर्जनाही केली आहे. (Ind vs Eng 2nd Test)

आणि भारतीय संघ (Indian team) आता दोन गोष्टींना उत्तर शोधतोय. भारतीय फिरकीपटूंना रिव्हर्स स्विप आणि स्कूपचे फटके मारणाऱ्या इंग्लिश फलंदाजांना रोखायचं कसं आणि राहुल (KL Rahul), जडेजा (Ravindra Jadeja) ऐवजी कुणाला संघात घ्यायचं. हैद्राबाद कसोटीत राहुलने ८६ तर जाडेजाने ८७ धावा केल्या होत्या. शिवाय जडेजा अष्टपैलू आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर तिसरा फिरकी गोलंदाज आणि मधल्या फळीतील आक्रमक डावखुरा फलंदाज अशी दुहेरी भूमिका तो निभावू शकतो. (Ind vs Eng 2nd Test)

(हेही वाचा – Indigo Scam : दिल्लीत इंडिगो ‘ट्रेनीने’ केलेल्या घोटाळ्यात प्रवाशाने गमावली ७२,००० रुपयांची तिकिटं)

के एल राहुलच्या जागी ‘या’ खेळाडूचा विचार 

जडेजा आणि राहुल ऐवजी सौरभ कुमार, सर्फराज खान आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा भारतीय संघात (Indian team) समावेश झाला आहे. आणि हैद्राबादचा अनुभव पाहता इंग्लिश फलंदाजांना आवर घालेल असा फिरकी गोलंदाज भारतीय संघाला हवा आहे. त्यामुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे मनगटाच्या जोरावर चेंडू वळवणाऱ्या कुलदीप यादवचा विचार करू शकतात. तर के एल राहुलच्या जागी आधीपासून संघात असलेल्या रजत पाटिदारचा विचार होऊ शकतो. आधीच्या कसोटीत तोच बारावा खेळाडू होता. (Ind vs Eng 2nd Test)

आणखी एक पर्याय भारताकडे आहे तो म्हणजे इंग्लिश संघाप्रमाणेच १ तेज गोलंदाज आणि ४ फिरकीपटू खेळवण्याचा. तसं झालं तर कुलदीप सिराज ऐवजी संघात येईल. आणि सर्फराझलाही मधल्या फळीत खेळायची संधी मिळेल. आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून वॉशिंग्टन सुंदरलाही संधी मिळू शकते. भारतीय संघ (Indian team) आधीच मालिकेत ०-१ असा पिछाडीवर असल्यामुळे भारतासमोरची समस्या अजून उठून दिसतेय. रवींद्र जडेजा ऐवजी वॉशिंग्टन सुंदरला घ्यायचं की, कुलदीप यादवला. आणि राहुल ऐवजी सर्फराजला संधी द्यायची की, रजत पाटिदारला हा प्रश्न सध्या भारतीय संघ प्रशासनाला पडला आहे. (Ind vs Eng 2nd Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.