Ram Bhajan: ठुमक चलत रामचंद्र बाजत पैजनियाँ…दिव्यत्वाचा महिमा सांगणारी अलौकिक ‘राम’ भजने !

श्री तुलसीदासजी भगवान रामाचे डोळे, कान आणि अलंकार यांचे वर्णन करतात.

278
Ram Bhajan: ठुमक चलत रामचंद्र बाजत पैजनियाँ...दिव्यत्वाचा महिमा सांगणारी अलौकिक 'राम' भजने !
Ram Bhajan: ठुमक चलत रामचंद्र बाजत पैजनियाँ...दिव्यत्वाचा महिमा सांगणारी अलौकिक 'राम' भजने !

भजन… (Ram Bhajan) भक्तिसंगीतातील एक प्रकार…महाराष्ट्राची लोककला…देवतेची स्तुतीपर काव्यरचना…देवाला भजणे किंवा त्याचे गुणगान आळवणे…टाळ, मृदुंग, पखवाज इत्यादी वाद्यांच्या साथीने देवाला आळवणे, भजणे, त्याच्या महतीचे वर्णन सुरात करणे …याला भजन म्हणणे असे म्हणतात. श्रीमद् भगवद्गगीतेच्या दसम स्कंधात होतो. भागवत काळापासून भजनाची परंपरा रूढ झाली. उत्तर भारतात भजन करणाऱ्या भजन करणाऱ्या भक्तांना भजनी म्हणतात. भजनात (Ram Bhajan) देवतेच्या गुणांचे वर्णन केलेले असते. याचा परिणाम व्यक्तिच्या शरीर आणि मनावर होतो. यामुळे नकारात्मकता दूर होऊन उत्साहात वाढ होते.

23 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या मूर्तीची स्थापना झाली. या काळात रामाची विविध भक्तिगीते, भजने, आरत्या…कानावर येत होत्या. आजही प्राणप्रतिष्ठापनेनंतरही प्रभु श्रीरामावर रचलेल्या…त्याची स्तुतीसुमने गाणाऱ्या दैवी आणि अलौकिक भजनांचा (Ram Bhajan) लोकं भक्तिभावाने ऐकताना दिसतात. वैष्णव भजनात रामकृष्णाच्या कथा म्हटल्या जातात. याशिवाय सूरदास, मीराबाई, संत कबीर, वैष्णव भजने (Ram Bhajan) तसेच अनेक संतांनीही विविध भाषांत प्रभु श्रीरामवर भजने रचली आहेत. या लेखात आपण प्रभु श्रीरामाच्या भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या भजनांतील वेगळेपण समजून घेऊ.

गुणांचे वर्णन आणि प्रभु श्रीरामाचे अलौकिकत्व
प्रभु श्रीराम हिंदु धर्माचे दैवत. एकवचनी, एकपत्नी, एकबाणी, सत्यवचनी, परम दयाळू, भगवान नारायणाचे (श्रीविष्णू) सातवे आहेत. अयोध्येचे सूर्यवंशी कुळातले राजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौसल्या यांचे पुत्र. मर्यादा-पुरुषोत्तम, भारतवर्षातला आदर्श राजा, जगभरातील अनेक देशांमध्ये ज्यांचा ‘आदर्श’ म्हणून पूजले जाते. आजही लोकं सुशासनाची उपमा ‘रामराज्य’ म्हणून करतात. हिंदू धर्मातील अनेक सण, दसरा, रामनवम, दीपावली या सणांदरम्यान प्रभु श्रीरामाच्या दिव्य, अलौकिक गुणांचे वर्णन करणारी ही भजने ऐकलेली जातात आणि यापुढेही अनंत काळ म्हटली जातील. रामाच्या दैवी गुणांचे वर्णन भजनांमध्ये करण्यात आले आहे. त्याचे आदर्श व्यक्तिमत्त्व, बालपण, सीता-स्वयंवर, वनवास, सीतेचे अपहरण, रावणाचा वध, रामाचे अयोध्येला परत येणे…अशा प्रभु श्रीरामाच्या आयुष्यातील विविध प्रसंगांचे वर्णन करणारी ही भजने (Ram Bhajan) कायमच उत्साह वाढवून, गाणाऱ्याबरोबर ऐकणाऱ्या श्रोत्यांनाही अवर्णनीय आनंद प्रदान करतात.

हिंदी भजने…!
मेरे झोपडी के भाग आज खुल जाएंगे…राम आऐंगे…राम आएंगे तो अंगना सजाउंगी…,भजन बिना चैन ना आये राम, अयोध्या सज रही सारी, अवध में राम आये है, छम छम नाचे देखो वीर हनुमाना, सजा दो घर का गुलशन सा अवध मे राम आए है, रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया…दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना ! अशी मधुर रसातली भजने प्रसिद्ध आहेत. यामध्ये प्रभु श्रीरामाचा शिष्य हनुमानाच्या गुणांचे वर्णनाही आढळते.

मराठी भजने…!
राम नामाचा लागे छंद, राम नामी रंगुया…, रामाचे भजन तेचि माझे ध्यान…, कल्याण करी रामाराया…,अणुमाजीं राम…,आज का निष्फळ होती बाण…,उठी श्रीरामा पहाट झाली…,एकवार तरी राम दिसावा…,कधी भेटेन वनवासी वियोगी..अशी काही भजने तर कबीराचे विणतो शेले…काल मी रघुनंदन पाहिले…कोठे सीता जनकनंदिनी…गा बाळांनो श्रीरामायण…, चला राघवा चला…चापबाण घ्या करी…!! अशी प्रभु श्रीरामाच्या जीवनाचे वर्णन सांगणारी चैतन्यमयी जुनी भक्तिगीते आजही प्रसिद्ध असून कार्यक्रम, मैफल, समारंभ यामध्ये म्हटली जातात.

(हेही वाचा – Ayodhya Ram mandir : जेव्हा राम मंदिरात उद्योगपती श्रीधर वेंबू यांच्या आईचं पाकीट हरवतं… )

भजनाचा मानवी शरीरावर होणारा परिणाम…
मनाची एकाग्रता साधणे, भजनातील शब्द, अर्थ, विचार, संगीत, स्वर, ताल, लय, वाद्ये आणि टाळ या सर्वांचे एकत्रीकरण भजनात असते. भजनाला संगीताच्या स्वरांची आणि नादमयतेची साथ असते. भज म्हणजे संगीत. नादब्रह्माशी, सप्तसुरांची आळवणी, प्रभु श्रीरामाच्या दिव्य शक्तीचे गुणगान, यामुळे चिंतन, एकाग्रता, मनाचे आरोग्य सकारात्मक राहते. बुद्धिचा विकास होतो, शारीरिक व्याधी दूर होणे, आत्मिक त्रास विरून जातात. भजन गाणारा साधक रामाच्या गुणांशी एकरूप होऊ शकतो. त्याचे मन आनंदाने भरून जाते. हातून कर्म चांगले घडते.

ठुमकं चलत रामचंद्र…
ठुमक चालत रामचंद्र हे १६व्या शतकात कवी गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिलेले एक भजन आहे. हे भजन श्रीरामाच्या बालपणीच्या गुणवैशिष्ट्यांचे कौतुक करते. श्री तुलसीदासजी भगवान रामाचे डोळे, कान आणि अलंकार यांचे वर्णन करतात. यामध्ये भगवान रामाची तुलना त्याच्या सांसारिक आयुष्यात घडणाऱ्या चमत्कारांशीही केली आहे. रामाचं समृद्ध मन…त्याचं कोमल हृदय…मधुर वाणी…त्याचे धारदार नाक पाहून तुलसीदासांना झालेल्या आनंदाचे वर्णन त्यांनी या भजनात केलेले आहे. १६व्या शतकातील पं. द. वि. पलुस्कर यांनी गायलेले हे भजन आजही लोकप्रिय असून आजही विविध ठिकाणी म्हटले जाते.

ठुमक चलत रामचंद्र बाजत पैजनियाँ॥
किलकि किलकि उठत धाय गिरत भूमि लटपटाय।
धाय मात गोद लेत दशरथ की रनियाँ॥
अंचल रज अंग झारि विविध भांति सो दुलारि।
तन मन धन वारि वारि कहत मृदु बचनियाँ॥
विद्रुम से अरुण अधर बोलत मुख मधुर मधुर।
सुभग नासिका में चारु लटकत लटकनियाँ॥
तुलसीदास अति आनंद देखके मुखारविंद।
रघुवर छबि के समान रघुवर छबि बनियाँ॥

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला चला!; भाजप ५४३ लोकसभा मतदारसंघात राबविणार मोहिम)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.