Mayank Agarwal Poisoned? विमानातील पाऊचमधील पेय प्यायल्यावर मयंक आजारी

मयंक अगरवालने घातपाताचा संशय व्यक्त करत या प्रकरणाची पोलीस तक्रार केली आहे. नेमकं काय झालं पाहूया. 

268
Mayank Agarwal Poisoned? विमानातील पाऊचमधील पेय प्यायल्यावर मयंक आजारी
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघातील माजी सलामीवीर आणि सध्या कर्नाटकच्या रणजी संघाचा कर्णधार मयंक अगरवालला (Mayank Agarwal) आगरताला विमानतळावरच शीतपेय प्यायल्यानंतर तोंड सुजून बोलताही येणं बंद झालं.. तो रणजी सामना खेळण्यासाठीच नवी दिल्लीला जायला निघाला होता. पण, त्रास झाल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर मयंकने विमानतळ प्रशासनाविरुद्ध पोलीस तक्रार केल्यामुळे नेमकं काय झालं हे न कळून सगळेच चक्रावले आहेत. (Mayank Agarwal Poisoned?)

इंडिगोच्या विमानात चढल्यावर मयंकच्या (Mayank Agarwal) सीटवर एक पाऊच ठेवलेलं होतं. आणि त्यात पाणी आहे असं समजून तो प्याल्यावर त्याला लगेचच हा त्रास सुरू झाला. मयंकने यात घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. आणि त्याच्या व्यवस्थापकाने पोलीस तक्रारही केली आहे. (Mayank Agarwal Poisoned?)

‘अगरवालच्या (Mayank Agarwal) व्यवस्थापकाने केलेल्या तक्रारीनुसार, मयंकच्या सीटच्या पुढच्या पॉकेटमध्ये पाऊच ठेवलेलं होतं. आणि त्यातील पाणी प्याल्यावर मयंकचं (Mayank Agarwal) तोंड क्षणात सूजलं. आणि त्याला बोलताही येईनासं झालं. अखेर त्याला स्थानिक आयएलएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची तब्येत आता स्थिर आहे,’ असं पोलीस अधिकाऱ्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं आहे. (Mayank Agarwal Poisoned?)

(हेही वाचा – Crime News : हातापायाची बोटे मोडून वैद्यकीय प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश)

मयंक अगरवाल भारताकडून २१ कसोटी सामने खेळला

मयंक (Mayank Agarwal) त्रिपुरा विरुद्धच्या रणजी करंडक सामन्यासाठी आगरतालाला गेला होता आणि कर्नाटकने हा सामना २९ धावांनी जिंकल्यानंतर खेळाडू बंगळुरूला परतत होते. त्यावेळी विमानतळावर ही घटना घडली. प्राथमिक उपचारांनंतर मयंकची तब्येत आता बरी आहे आणि लवकरच तो बंगळुरूला जाणार आहे. (Mayank Agarwal Poisoned?)

पोलीस झाल्या प्रकाराचा तपास करणार आहेत. पण, प्रत्यक्षदर्शी त्यांना यात कुठलाही घातपात दिसत नाहीए. मयंक अगरवाल भारताकडून २१ कसोटी सामने खेळला आहे. आणि आताही त्रिपुरा विरुद्धच्या सामन्यात त्याने कर्नाटकसाठी ५१ आणि १७ धावांचं योगदान दिलं. कर्नाटकचा पुढील रणजी सामना २ फेब्रुवारीला रेल्वे विरोधात सुरत इथं आहे. पण, तो मयंक खेळू शकणार नाहीए. (Mayank Agarwal Poisoned?)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.