China Kabutar : हेरगिरीच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या ‘चिनी कबूतरा’ची पिंजऱ्यातून सुटका

हेरगिरीच्या संशयावरून पिरपाव जेट्टी येथून आठ महिन्यापूर्वी आरसीएफ पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चिनी कबूतराची अखेर परळच्या बैलघोडा रुग्णालयातील पिंजऱ्यातून मंगळवारी सुटका करण्यात आली आहे. पिंजऱ्यातून मुक्त केल्यानंतर या कबूतराने आकाशात झेप घेत काही वेळ रुग्णालयाभोवती घिरट्या घालून आपल्या मायदेशी परतले.

206
China Kabutar : हेरगिरीच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या 'चिनी कबूतरा'ची पिंजऱ्यातून सुटका

हेरगिरीच्या संशयावरून पिरपाव जेट्टी येथून आठ महिन्यापूर्वी आरसीएफ पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चिनी कबूतराची (China Kabutar) अखेर परळच्या बैलघोडा रुग्णालयातील पिंजऱ्यातून मंगळवारी सुटका करण्यात आली आहे. पिंजऱ्यातून मुक्त केल्यानंतर या कबूतराने (China Kabutar) आकाशात झेप घेत काही वेळ रुग्णालयाभोवती घिरट्या घालून आपल्या मायदेशी परतले. १९ जानेवारी रोजी ‘हिंदुस्थान पोस्ट’ने आठ महिन्यांपासून पिंजऱ्यात बंद असलेल्या कबूतराचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आरसीएफ पोलिसांनी चिनी कबूतराला (China Kabutar) मुक्त करण्यासाठी सोमवारी ना हरकतीचे पत्र रुग्णालयाला दिले. पोलिसांचे पत्र मिळाल्यानंतर आम्ही मंगळवारी कबूतराला मुक्त केले असे बैलघोडा रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉक्टर मयूर डांगर यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना सांगितले. (China Kabutar)

पूर्व उपनरातील चेंबूरच्या आरसीएफ पोलिसांच्या हद्दीत असणारी पिरपाव जेट्टी येथील सुरक्षा व्यवस्था केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) ताब्यात आहे. १७ मे २०२३ रोजी एक कबूतर जखमी अवस्थेत सीआयएसएफच्या जवानाला आढळून आले, हे कबूतर (China Kabutar) तैवान देशातून आलेल्या जहाजावरुन आल्याच्या संशयावरून तसेच या कबूतरांच्या एका पायात तांब्याची रिंग आणि एका पायात एक चिप बसविण्यात आली होती, त्याचबरोबर कबूतरांच्या (China Kabutar) पंखांच्या दोन्ही बाजूंनी लाल आणि हिरव्या रंगात चिनी भाषेत काही तरी संदेश लिहिलेला आढळून आल्यामुळे हे कबुतर (China Kabutar) चीन देशातून हेरगिरी करण्याच्या उद्देशातून पाठविण्यात आल्याचा संशय आरसीएफ जवानांना आल्यामुळे त्यांनी तात्काळ आरसीएफ पोलिसांना याबाबत सूचना दिली होती. (China Kabutar)

(हेही वाचा – Mayank Agarwal Poisoned? विमानातील पाऊचमधील पेय प्यायल्यावर मयंक आजारी)

अधिकृत पत्र आल्यावरचं कबूतराला मुक्त करु – डॉ. डांगर

आरसीएफ पोलिसांनी हे चिनी कबूतर (China Kabutar) ताब्यात घेऊन त्याच्या पायाला लावलेली रिंग आणि दुसऱ्या पायाला असलेली चिप काढून कबूतराच्या पंखाचे छायाचित्र काढून तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले व कबूतराला उपचारासाठी परळच्या बैलघोडा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासात हे कबूतर हेरगिरी करण्यासाठी आलेले नव्हते तर त्याच्या पायातील चिपवरून हे कबूतर (China Kabutar) रेसिंगसाठी तैवानमध्ये वापरले गेले होते. तैवान देशातून आलेल्या मालवाहक जहाजातून हे कबूतर आले व जखमी अवस्थेत पिरपाव जेट्टी येथे किनाऱ्यावर मिळून आले होते अशी महिती तपासात समोर आली होती. (China Kabutar)

परळच्या बैलघोडा रुग्णालयात दाखल असलेले चिनी कबूतर (China Kabutar) आठ महिन्यांपासून एका पिंजऱ्यात बंदिस्त होते. हिंदुस्थान पोस्टचे प्रतिनिधींनी बैलघोडा रुग्णालयाला भेट देऊन येथील रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉ. मयूर डांगर यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की, हे कबूतर (China Kabutar) १८ मे २०२३ रोजी चेंबूर येथील आरसीएफ पोलिसांनी आम्हाला दिले होते. हे कबूतर पूर्णपणे बरे आणि ठणठणीत आहे, मात्र पोलिसांच्या आदेशाविना त्याला मुक्त करता येत नाही असे डॉ. डांगर यांनी सांगितले होते. पोलीस आम्हाला अधिकृत पत्र पाठवून या कबूतराला सोडण्याचा आदेश देतील त्यावेळी आम्ही हे कबूतराला पिंजऱ्यातून आणि आमच्या कस्टडीतुन मुक्त करू असे डॉ. डांगर यांनी हिंदूस्थान पोस्टशी बोलताना म्हणाले होते. (China Kabutar)

(हेही वाचा – China Kabutar: हेरगिरीच्या संशयावरून ताब्यात घेतले ‘चिनी कबूतर’, ८ महिन्यांपासून पिंजऱ्यात बंदिस्त)

शर्यती लावण्यासाठी केला जायचा चिनी कबूतराचा वापर 

दरम्यान हिंदुस्थान पोस्टने आरसीएफ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, कबूतर अजूनही हॉस्पिटलच्या ताब्यात असल्याबद्दल त्यांनी प्रथम आश्चर्य व्यक्त केले रुग्णालयाकडून आम्हाला एक पत्र प्राप्त झाले होते, म्हणून आम्ही असे गृहित धरून चाललो की त्यांनी त्याला सोडले असेल असे पाटील म्हणाले. पाटील यांनी पुढे सांगितले की, या कबूतराबाबतचा आमचा संशय केव्हाच दूर झाला आहे, हे कबूतर (China Kabutar) हेरगिरी करण्यासाठी आलेले नव्हते हे फॉरेन्सिक लॅबच्या अहवालातून समोर आले आहे. हे कबूतर (China Kabutar) शर्यतीमधील कबूतर असून तैवानमध्ये मोठ्या प्रमाणात कबूतरांची शर्यती लावण्यात येतात त्यापैकी एक हे कबूतर आहे. लवकरच वरिष्ठांची परवानगी घेऊन या कबूतराला मुक्त करण्यासाठी रुग्णालयासोबत पत्रव्यवहार करण्यात येईल असे पाटील यांनी हिंदूस्थान पोस्टशी बोलताना सांगितले. दरम्यान सोमवारी आरसीएफ पोलिसांनी बैलघोडा रुग्णालयाला पत्र देऊन कबूतराला (China Kabutar) मुक्त करण्याबाबत आमची काही एक हरकत नाही या आशयाचे पत्र पाठवले. सोमवारी रुग्णालयाला पत्र मिळाल्यानंतर तेथील डॉक्टरांनी कबूतराची (China Kabutar) पुन्हा एकदा तपासणी करून ते पूर्णपणे बरे झाल्याची खात्री करून मंगळवारी या चिनी कबूतराला पिंजऱ्यातून मुक्त करण्यात आले. पिंजऱ्यातून मुक्त होताच हे कबूतर आकाशाकडे झेपावले. (China Kabutar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.