Shivneri : शिवनेरी किल्ला सौरऊर्जेने उजळणार; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

216
Shivneri : शिवनेरी किल्ला सौरऊर्जेने उजळणार; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
Shivneri : शिवनेरी किल्ला सौरऊर्जेने उजळणार; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

शिवनेरी (Shivneri) किल्ल्यावर कायमस्वरूपी वीज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सौर पॅनेल बसविता येतील का, हे महाऊर्जाकडून तांत्रिक आणि व्यवहार्यता तपासणी करून घ्यावी. याबाबत एएसआयसह सर्व विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी. किल्ले शिवनेरीवर नव्याने कायमस्वरूपी निर्माण करावयाच्या सुधारणांसाठी निधीचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. (Pune News)

(हेही वाचा – Param Bir Singh : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सीबीआयकडून दिलासा)

आरोग्यसुविधा उभाराव्या

गडावर एखाद्या भक्ताबाबत आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास उपाययोजना म्हणून आवश्यक वैद्यकीय साधनांसह प्राथमिक उपचारांसाठी तीन-चार खाटांची व्यवस्था करावी. दरवर्षीप्रमाणे गडाच्या रस्त्यावर नियोजित ठिकाणी आरोग्य पथके नेमावीत. यासह जुन्नर ग्रामीण रुग्णालय (Junnar Rural Hospital) आणि अन्य खासगी रुग्णालयातही आवश्यक खाटा राखीव ठेवाव्यात. हृदयाशी संबंधित उपचारांसाठी तज्ज्ञ डॉक्टर नेमावेत.

परिवहन मंडळाने अधिकच्या बसेसची व्यवस्था करावी, किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यांवर दिव्यांची व्यवस्था करावी. सर्व उत्सव व्यवस्थित होईल, यासाठी दरवर्षीप्रमाणे प्रभावी नियंत्रण कक्ष स्थापन करावा. स्थानिक स्वराज्य संस्था, वनविभागाने (Forest Department) स्वच्छतेच्या अनुषंगाने पुरेशा फिरत्या शौचालयांची व्यवस्था करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी दिल्या.

(हेही वाचा – Gyanvapi Case : ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा करण्याची न्यायालयाची परवानगी; हिंदू पक्षाला मिळाले मोठे यश)

भक्कम बॅरिकेटींगची व्यवस्था करावी

पंचायत समिती, तसेच अन्य विभागांनी पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी दरवर्षीपेक्षा अधिक टँकरची व्यवस्था, तसेच आरोग्य विभागामार्फत पाणी स्रोतांचे टीसीएलद्वारे निर्जंतुकीकरण, पाण्याची वेळोवेळी तपासणी करावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण म्हणाले.

किल्ल्यावर जात असतांना प्रवेशद्वारांच्या ठिकाणी मोठी गर्दी होत असल्याने भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, तसेच पोलीस प्रशासनावरही मोठा ताण निर्माण होता. त्यामुळे प्रवेशद्वारांच्या ठिकाणी येणाऱ्या आणि जाणाऱ्या भक्तांसाठी वेगळी रांग करण्यासाठी या कालावधीत भक्कम बॅरिकेटींगची व्यवस्था एएसआयने निर्माण करावी, असे पोलीस अधीक्षक गोयल या वेळी म्हणाले.

आमदार बेनके, तसेच जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य बुचके यांनी वीजपुरवठा, स्वच्छता आदींच्या अनुषंगाने सूचना दिल्या.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.