ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील भातसई आश्रम शाळेतील तब्बल 350 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा (Poison) झाल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. या प्रकरणी 55 विद्यार्थ्यांवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
(हेही वाचा Gyanvapi : देशभरात गाजलेल्या ज्ञानवापीचा काय आहे इतिहास? )
यासंबंधीच्या वृत्तानुसार, शहापूर तालुक्यातील वासिंद परिसरातील भातसई येथील संत गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील 350 विद्यार्थ्यांना बुधवारी, 31 जानेवारी रोजी दुपारच्या सत्रात डाळ, भात, भाजी, गुलाबजाम असे जेवण देण्यात आले. जेवण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ, अस्वस्थ वाटू (Poison) लागले. अनेक विद्यार्थी चक्कर येऊन पडले. त्यानंतर व्यवस्थापनाने शाळेतील शिक्षक व स्थानिकांच्या मदतीने तत्काळ विद्यार्थ्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
Join Our WhatsApp Community