Rahul Kanal : …तर राजकारण सोडून देईन; राहुल कनाल, अमेय घोले यांचे संजय राऊतांना आव्हान

ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेच्या युवा सेनेचे पदाधिकारी राहूल कनाल व अमेय घोले यांनी कोविड काळात जे अनेक घोटाळे झाले त्यात प्रामुख्याने खिचडी वाटपात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता.

307
Rahul Kanal : ...तर राजकारण सोडून देईन; राहुल कनाल, अमेय घोले यांचे संजय राऊतांना आव्हान

मी बाळासाहेब भवनमध्ये स्व. बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की, कोविड काळातील कुठल्याही घोटाळ्यात आढळले, मग तो रेमडिसीवीर घोटाळा असो, कोविड बॉडी बॅग घोटाळा असो किंवा खिचडी घोटाळा असो, यातील कुठल्याही घोटाळ्यात जर माझे किंवा अमेय घोले यांचे नाव आढळले तर आम्ही आमच्या राजकीय कारकिर्दीचा राजीनामा देऊ. अन्यथा तुम्ही तुमच्या राज्यसभेतील खासदारकीचा राजीनामा द्याल का? असे खुले आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या युवा सेनेचे सरचिटणीस राहुल कनाल (Rahul Kanal) व अमेय घोले (Amey Ghole ) यांनी थेट उबाठा गटाचे नेते खा. संजय राऊत यांना बुधवारी (३१ जानेवारी) दिले. (Rahul Kanal)

ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेच्या युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल (Rahul Kanal) व अमेय घोले यांनी कोविड काळात जे अनेक घोटाळे झाले त्यात प्रामुख्याने खिचडी वाटपात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्यावर आज बाळासाहेब भवन या पक्ष कार्यालयांत दोन्ही युवा नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटाचे नेते खा. राऊत यांची शेलक्या शब्दात चांगलीच खरडपट्टी काढत कोविड काळात वरळीतील हिल टॉप हॉटेलमध्ये कोणता कारकून काम करत होता, ९० ते १०० कोटींचा फंड कुठे गायब झाला याचे उत्तर संजय राऊत यांनी जनतेसमोर द्यावे, असे खुले आव्हानच दिले. (Rahul Kanal)

जर तुम्ही खरे बोलत आहात अशी तुमची खात्री असेल तर तुम्ही जनतेसमोर मीडियासमोर येऊन बोला, तुम्हाला हवा तितका वेळ घ्या आणि आमच्याविरोधात पुरावे सादर करा. जर आम्ही दोषी आढळलो, तर आम्ही कायदेशीर कारवाईला सामोरे जायला सुद्धा तयार आहोत, असे सांगत आमचे कोव्हिड काळातील कामे सामनातही त्यावेळी छापून आलीत. त्यावेळी मी कोविडमध्ये केलेल्या कामासाठी मला तुमचेच नेते उद्धव ठाकरे यांनी मला पुरस्कारही दिला होता. मात्र आम्ही काम करत असताना तुम्ही कुठे होता? असा खडा सवाल करीत कनाल व घोले यांनी पुन्हा एकदा थेट राऊत यांच्यावर निशाणा साधला. (Rahul Kanal)

मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रेमापोटी पक्षात आलो – कनाल 

खिचडी घोटाळ्यासंदर्भात ज्या लोकांची चौकशी सुरु आहे. त्यात त्यांच्या आजूबाजूचेच लोक आहेत. मात्र मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर आम्ही पक्ष सोडला. पण ज्या चौकशा कारकुनांवर व इतर लोकांवर सुरु आहेत, त्या आजही आहेत. पण तपास यंत्रणांनी दीड वर्षांच्या काळात माझी किंवा राहुलची साधी चौकशीही केलेली नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे. मी १० महिने आरोग्य समिती अध्यक्ष असताना इतर खूप लोकांवर मग ते महापौर असोत, किंवा इतर कोणीही असोत. त्यांच्यावर आरोप व्हायचे. परंतु त्या काळात व नंतरच्या काळात, म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळातही आणि नंतर युती सरकार आल्यानंतर, दोन्ही कार्यकाळात माझ्यावर कुठलाही आरोप करण्यात आला नव्हता. किंवा कुठल्याही तपास यंत्रणेची साधी केस माझ्यावर नाही आहे. मी फक्त मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या प्रेमापोटी पक्षात आलेलो आहे. ज्यांच्यावर केसेस आहेत त्या सर्वांची नावे पब्लिक वेब पोर्टलवर सुद्धा उपलब्ध आहेत. त्यापुढे जर कुठलीही माहिती हवी असल्यास माहितीच्या अधिकाराच्या खाली आरटीआय टाकून ती माहिती आपण मिळवू शकता. उलटपक्षी पण ज्या त्यांच्या लोकांची नावे घोटाळ्यात जगजाहीर झालेली तरं आहेच पण त्यांनी केलेले व्यवहारही जगासमोर आलेले आहेत. मात्र याबाबतीत त्यांनी कधीही खुलासा केलेला नाही, असे प्रश्नचिन्हही घोले यांनी यावेळी उपस्थित केले. (Rahul Kanal)

आम्हाला संजय राऊतांना एक प्रश्न विचारायचा आहे, जे लोक यांचे दौरे सांभाळायचे ते सुनील बाळा कदम, सुजित पाटकर यांचे बँक अकाऊंटमध्ये मोठ्या प्रमाणावर बेनामी रकमा ट्रान्स्फर झालेल्या आहेत. जर आम्ही खोटे बोलत असू, तर तुम्ही सीसीटीव्ही कव्हरेज शोधा. कोविडच्या काळात व कोविड नंतरही हे लोक महापौर बंगल्यावर का जायचे? कुठल्या अधिकाराने जायचे? किती अधिकाऱ्यांना राऊत यांचे फोन गेलेत, हे रेकॉर्ड वर काढा, सगळ्यांचे रेकॉर्डस् आहेत. आम्ही ऑन रेकॉर्ड ऑन फॅक्ट्स बोलतो. राऊत यांचे फोन कोणाकोणाला जायचे, कुठल्या अधिकाऱ्यांना जायचे आणि त्यांच्यात काय संभाषण व्हायचे याची माहिती सुद्धा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी द्यावी. सुजित पाटकर, सुनील बाळा कदम किंवा इतर कुणीही असोत. या घोटाळ्यात जे जे लोक सापडले आहेत. जे ईडी व इतर संस्थांनी सिद्ध केलेले आहेत. यात आमची नावे कुठेही नाहीत. फक्त खिचडी नाही तर इतरही मेडिकल एजन्सीज आहेत त्यांचीही तुम्ही माहिती काढा. मग यात सुनील बाळा कदम आणि सुजित पाटकर कुठे कुठे सहभागी आहेत ते कळेल, असेही कनाल यांनी ठासून सांगितले. (Rahul Kanal)

(हेही वाचा – IPS Officer Transfer : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल, ५८ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या)

तुम्ही आरटीआय टाका, आम्ही सुद्धा आरटीआय टाकतो

अमेय घोले पुढे म्हणाले की, संजय राऊत (Sanjay Raut) यांना आमचे आव्हान आहे की पुढच्या ३० ते ४५ दिवसांत तुम्ही आरटीआय टाका, आम्ही सुद्धा आरटीआय टाकतो. आम्ही पुरावे सादर करतो, तुम्ही सुद्धा तुमच्या वतीने पुरावे सादर करा. एकत्र पत्रकार परिषद घ्या किंवा वेगवेगळी पत्रकार परिषद घ्या आमची कसलीही तयारी आहे. त्यात कुणाकुणाची नावे येत आहेत, ते सर्वाना कळू दे. कोण किती पाण्यात आहे ते सर्वांना कळू द्या. कोण कुठल्या कामासाठी फोन करायचे, वरळी हिल टॉप हॉटेल मधले सर्व सीसीटीव्ही चेक करा. कुठले पीडब्ल्यूडीचे अधिकारी हिल टॉप हॉटेलच्या कुठल्या कारकुनाला भेटले होते याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आम्ही उद्या आरटीआय टाकणार आहोत आणि येणाऱ्या काळात खिचडी घोटाळ्यामध्ये सहभागी असलेल्या लोकांची नावे जाहीर करणार आहोत, असा खणखणीत इशाराही त्यांनी यावेळी दिला. (Rahul Kanal)

आम्ही बांद्रा पश्चिमेला कोविड व्हॅक्सिनेशन सेंटरच्या उद्घाटनासाठी तुम्हीच आला होतात. तेव्हा मी तुमच्यासाठी चांगला होतो का? जर मी जर घोटाळेबाज होतो तर तुम्ही माझ्याकडून काम का करून घेतले. २०२३ माझ्या लग्नाला सुद्धा संजय राऊत आले होते. म्हणजे तेव्हा राहुल कनाल चांगला होता, तेव्हा राहुल कनाल चोर नव्हता. माझ्याकडे माझ्या दीड वर्षांच्या कामाचा माझ्याजवळ अहवाल आहे. तुम्ही खिचडी बोलता, आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून एक लाख रेशनची पाकिटे वाटली. आम्ही सरकारकडून किंवा महापालिकेकडून पैसे घेऊन हे केले नाही, तर आम्ही स्वतः केलेल्या कष्टाचे पैसे खर्च केले. वरळीमध्ये पहिली ऍम्बुलन्स कोविड काळात मी सुरु केली. कोळीवाड्यात रेशन पाकिटे देण्यासाठी जायला कुणी तयार नव्हते, तेव्हा आमच्या युवा सेनेने ते काम केले. तिथे औषधे मिळत नव्हती, तेव्हा रात्रंदिवस युवासेनेच्या माध्यमातून तिथे औषधे दिली. त्यावेळेस संजय राऊत कुठे होते? यांनी स्वतः कधी जाऊन कोणत्या माणसाचा जीव वाचवला आहे का? कोविड काळात स्मशानात जाऊन कुणावर अंत्यसंस्कार केलेत का? याचे त्यांनी उत्तर द्यावे. कारण आम्हाला त्यांच्यासारखे सकाळी बोलून पळून जाणे आम्हाला आवडत नाही. संजय राऊत यांना आमचे सांगणे आहे की, तुम्ही कोर्टात जा. मीडियासमोर ओपन डिबेटमध्ये या आणि समोरासमोर बसा. आम्हाला किती वेळ हवा ते सांगा. जर तुम्ही समोर येऊन उत्तर दिले नाही तर आम्ही मानू की आपण माफी मागितली आहे आणि राजीनामा द्यायला तयार आहात, असेही खुले आव्हानच कनाल यांनी राऊत यांना दिले. (Rahul Kanal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.