देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी त्यांच्या कारकीर्दीतील सहावा अंतरिम अर्थसंकल्प मांडला. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा ४ महिन्यांसाठीचा लेखानुदान अर्थसंकल्प होता. अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच अर्थमंत्र्यांनी ‘आम्ही गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी अशा ४ वास्तविक जातींवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या गरजा, महत्त्वाकांक्षा आणि विकास या गोष्टी आमच्या प्राधान्याक्रमावर आहेत’, असे सांगत अर्थसंकल्पाची दिशा स्पष्ट केली. (Budget 2024 )
(हेही वाचा – Budget 2024 : अर्थसंकल्पाशी संबंधित ही 92 वर्षे जुनी परंपरा कधी बदलली, हे तुम्हाला माहीत आहे का ?)
या वेळी अर्थमंत्र्यांनी केलेल्या आकर्षक घोषणा
- देशाच्या भांडवली खर्चासाठी नवीन आर्थिक वर्षासाठी ११.१ लाख कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ११.१ टक्क्यांची वाढ झाली आहे.
- नवीन टेक-सॅव्ही उद्योजकतेनं भारलेल्या तरुणांसाठी नवीन अर्थसहाय्य योजना. त्यासाठी १ लाख कोटी रुपयांची तरतूद. या निधीतून तरुणांना कमी व्याजदराने किंवा काही वेळा व्याजरहित कर्ज उपलब्ध करून देणार.
- आयुष्मान भारत (Ayushman Bharat) योजनेचा फायदा आता अंगणवाडी आणि आशासेविकांनाही मिळणार.
- गरोदर माता आणि नवजात अर्भकासाठी असलेल्या कल्याण योजनेला अधिक सर्वसमावेशक करणार. त्यासाठी नवीन योजना आणणार.
- ‘लखपती दीदी’ योजनेचं उद्दिष्टं २ कोटी रुपयांवरून ३ कोटी रुपयांवर आणलं. (Budget Session 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community