Budget 2024 : ४०,००० रेल्वे डबे वंदे भारत कोचेसमध्ये परिवर्तित करणार; पर्यटनामध्ये लक्ष्यद्वीपचा विशेष उल्लेख

279
Budget 2024 : ४०,००० रेल्वे डबे वंदे भारत कोचेसमध्ये परिवर्तित करणार; पर्यटनामध्ये लक्ष्यद्वीपचा विशेष उल्लेख
Budget 2024 : ४०,००० रेल्वे डबे वंदे भारत कोचेसमध्ये परिवर्तित करणार; पर्यटनामध्ये लक्ष्यद्वीपचा विशेष उल्लेख

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी त्यांच्या कारकीर्दीतील सहावा अर्थसंकल्प मांडला. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा ४ महिन्यांसाठीचा अंतरिम अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पात आध्यात्मिक पर्यटनासह देशातील मेट्रो रेल, नमो भारत रेल, वंदे भारत या रेल्वेंचे जाळे निर्माण करण्यावरही भर देण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात लक्ष्यद्वीपचा विशेषत्वाने उल्लेख करण्यात आला आहे. (Budget 2024 )

(हेही वाचा – Budget 2024 : यंदाचा अर्थसंकल्प गरीब, महिला, युवा आणि अन्नदात्यांसाठी; काय म्हणाल्या अर्थमंत्री)

पर्यटन आणि परिवहन यांसाठी केलेल्या तरतुदी
  • देशातील बेटांचा विकास करून तिथे पर्यटनाची सोय करणार. लक्षद्वीप बेटांचा पर्यटनासाठी विकास करणार. त्याचबरोबर आध्यात्मिक पर्यटनावरही भर देणार. राज्यांना त्यांच्याकडील पर्यटन स्थळं शोधून त्यांचा विकास करण्यासाठी प्रोत्साहित करणार
  • मेट्रो रेल (Metro Rail), नमो भारत रेल (Namo Bharat Rail) यांचा विस्तार जास्तीत जास्त शहरांमध्ये करण्यात येणार. ४०,००० रेल्वे डबे वंदे भारत (Vande Bharat) कोचेसमध्ये परिवर्तित करण्यात येणार
  • इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन मिळावं, यासाठी त्यांचं उत्पादन आणि चार्जिंगची सोय व्हावी, यासाठी पायाभूत सुविधा उभारणीला सरकार मदत करणार. हरित विकासाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बायो-उत्पादनाची नवीन योजना आणणार.
  • विमान वाहतूक क्षेत्रात मागच्या १० वर्षांतील सगळ्यात मोठी गुंतवणूक या सरकारने केली. त्यामुळे देशातील विमानतळांची संख्या दुपटीने वाढून १४९ रुपये झाली आहे.

(हेही वाचा – Budget 2024 : अर्थसंकल्पाशी संबंधित ही 92 वर्षे जुनी परंपरा कधी बदलली, हे तुम्हाला माहीत आहे का ?)

यंदा करसंकलन १.६६ लाख कोटी रुपयांवर
  • जीएसटी (GST) सरासरी कर संकलन दरवर्षी १.६६ लाख कोटी रुपयांवर
  • जीएसटी कर लागू होणाऱ्या वस्तू आणि सेवांचा आवाका दुपटीने वाढला. त्यामुळे जीएसटी सरासरी कर संकलन दरवर्षी १.६६ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं. हे प्रमाणही दुपटीने जास्त आहे.
  • प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांमध्ये कुठलाही बदल नाही.
  • आर्थिक वर्ष २०२५ मध्ये वित्तीय तूट जीडीपीच्या ५.१ टक्क्यांवर आणण्याचं उद्दिष्टं. (Budget 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.