ऋजुता लुकतुके
मध्यमवर्गीयांचं अर्थसंकल्पाकडे लक्ष असतं ते कर सवलतीसाठी. आयकरातून नेमकी किती सूट मिळते याचं गणित करदाता मांडत असतो. पण, यंदा अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी करदात्यांना कुठलीही अतिरिक्त सवलत दिलेली नाही. उलट नवीन व जुन्या करप्रणालीत त्यांनी कुठलाही बदल केला नाही. ‘प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करात कुठलेही बदल या अंतरिम अर्थसंकल्पात प्रस्तावित नाहीत,’ असं अर्थमंत्री भाषणाच्या शेवटी म्हणाल्या. (Interim Budget 2024)
(हेही वाचा – Budget 2024 : यंदाचा अर्थसंकल्प गरीब, महिला, युवा आणि अन्नदात्यांसाठी; काय म्हणाल्या अर्थमंत्री)
गुरुवारी लोकसभेत सादर झालेला अर्थसंकल्प हा लेखानुदान स्वरुपाचा होता. पुढील चार महिन्यांसाठी सरकारी खर्चाची तरतूद करण्यासाठी लेखानुदान मांडण्यात आलं. सार्वत्रिक निवडणुका (loksabha election 2024) होऊन नवीन सरकार सत्तेत येईपर्यंत पूर्ण मुदतीचा अर्थसंकल्प मांडता येणार नाही. त्यामुळे कर रचनेविषयी क्रांतीकारी घोषणांची अपेक्षा नव्हतीच. पण, अर्थमंत्र्यांनी कर रचना (tax slab 2024) तीच ठेवून मध्यमवर्गीयांची थोडीफार निराश जरुर केली.
Watch Live: Smt @nsitharaman presents Union Interim Budget 2024 in Parliament. @PIB_India @FinMinIndia @MIB_India @sansad_tv @cbic_india @IncomeTaxIndia@DFS_India#ViksitBharatBudgethttps://t.co/IYMtzTooQy
— Nirmala Sitharaman Office (@nsitharamanoffc) February 1, 2024
जुनी कर रचना आणि नवीन कर रचने अंतर्गत कर दायित्व नेमकं किती आहे. ते पाहूया,
जुनी कर रचना
वर्षिक उत्पन्न ३ लाख रु पर्यंत – ० %
वार्षिक उत्पन्न ३ ते ६ लाख रु. – ५ %
वार्षिक उत्पन्न ६ ते ९ लाख रु. – १० %
वार्षिक उत्पन्न ९ ते १२ लाख रु. – १५ %
वार्षिक उत्पन्न १२ ते १५ लाख रु. – २० %
वार्षिक उत्पन्न १५ लाख रुच्या वर – ३० %
नवीन कर रचना
वर्षिक उत्पन्न ३ लाख रु पर्यंत – ० %
वार्षिक उत्पन्न ३ ते ६ लाख रु. – ५ %
वार्षिक उत्पन्न ६ ते ९ लाख रु. – १० %
वार्षिक उत्पन्न ९ ते १२ लाख रु. – १५ %
वार्षिक उत्पन्न १२ ते १५ लाख रु. – २० %
वार्षिक उत्पन्न १५ लाख रुच्या वर – ३० %
पण, नवीन कर रचनेत ८० सी अंतर्गत मिळणारे कर वजावटीचे फायदे मिळत नाहीत. (Interim Budget 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community