PM Narendra Modi : “आजचा अर्थसंकल्प म्हणजे तरुण भारताच्या युवा आकांक्षांचे प्रतिबिंब”

अर्थसंकल्पात दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. संशोधन आणि नाविन्यपूर्णतेसाठी १ लाख कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात, वित्तीय तूट नियंत्रणात ठेवत, भांडवली खर्चाला ११, ११, १११ कोटी रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक देण्यात आला आहे.

265
Modi Govt कडून मंत्रिमंडळ समित्यांची घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज म्हणजेच गुरुवार १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर (Budget 2024) केला. या अंतरिम अर्थसंकल्पात (Budget 2024) निर्मला सीतारामन कोणकोणत्या तरतुदी आणि घोषणा (Budget 2024) करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. अर्थमंत्र्यांना निवडणुका पार पडेपर्यंतच्या खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पात करावी लागणार आहे. त्यामुळे मोठ्या अथवा लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता नसल्याचे अर्थतज्ज्ञांनी सांगितले होते. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Budget 2024 : ४०,००० रेल्वे डबे वंदे भारत कोचेसमध्ये परिवर्तित करणार; पर्यटनामध्ये लक्ष्यद्वीपचा विशेष उल्लेख)

अशातच आता या अर्थसंकल्पावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘आजचा अर्थसंकल्प म्हणजे तरुण भारताच्या युवा आकांक्षांचे प्रतिबिंब’ असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – Interim Budget 2024 : मध्यमवर्गीयांना करांमध्ये कुठलाच दिलासा नाही)

नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?
भारताला विकसित राष्ट्र बनवण्याची हमी –

केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “हा अंतरिम अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण आहे. हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या युवा, गरीब, महिला आणि शेतकरी या ४ स्तंभांना सक्षम करेल”, असं नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच हा अर्थसंकल्प २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याची हमी देतो, असंही नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले. या अर्थसंकल्पात तरुण भारताच्या युवा आकांक्षांचे प्रतिबिंब असल्याची प्रतिक्रिया देखील नरेंद्र मोदींनी दिली.

(हेही वाचा – Budget 2024 : जाणून घ्या अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट किती वेळात पूर्ण केलं ?)

तरुणांसाठी असंख्य नवीन रोजगार संधी तयार होतील – 

अर्थसंकल्पात दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. संशोधन आणि नाविन्यपूर्णतेसाठी १ लाख कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात, वित्तीय तूट नियंत्रणात ठेवत, भांडवली खर्चाला ११, ११, १११ कोटी रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक देण्यात आला आहे. अर्थतज्ञांच्या भाषेत बोलायचे झाले तर हे ‘स्वीट स्पॉट’ आहे. यासह, भारताच्या २१व्या शतकातील आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच, तरुणांसाठी असंख्य नवीन रोजगार संधी तयार होतील, असं नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.