वाराणसी न्यायालयाने हिंदू पक्षाच्या याचिकेवर हिंदूंच्या बाजूने निर्णय देत ज्ञानवापीच्या (Gyanvapi) व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार दिला. जिल्हा प्रशासनाला ७ दिवसांत बंदोबस्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ज्ञानवापी परिसरातील तळघरातून रात्रभरात बॅरिकेड्स हटवण्यात आले. अवघ्या 9 ते 10 तासांत स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने संयुक्तपणे जिल्हा न्यायाधीशांच्या आदेशाचे पालन करून ज्ञानवापी (Gyanvapi)संकुलात असलेले व्यास तळघर उघडले. यानंतर 1 फेब्रुवारी रोजी पहाटेपासूनच पूजेसाठी लोकांची गर्दी होऊ लागली.
न्यायालयाच्या निणर्यानंतर अत्यंत कडेकोट प्रशासकीय बंदोबस्तात पूजा सुरू झाली. तब्बल 31 वर्षांनंतर ज्ञानवापी परिसरात पूजा सुरू झाली आहे. विश्वनाथ मंदिराचे मुख्य पुजारी ओम प्रकाश मिश्रा आणि अयोध्येतील रामललाच्या अभिषेकासाठी शुभ मुहूर्त ठरवणारे गणेश्वर द्रविड यांनी तळघरात पूजा केली. पूजेचे अधिकार काशी विश्वनाथ ट्रस्टला देण्यात आले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर ज्ञानवापी (Gyanvapi) येथे पूजा विधी सुरु झाल्यावर आता स्थानिक हिंदूंनी चक्क या ठिकाणचा बोर्ड बदलला. त्याठिकाणी ज्ञानवापी मंदिर असा फलक लावला. त्यामुळे आता या ठिकाणी हिंदूंचा उत्साह वाढल्याचे दिसत आहे.
Join Our WhatsApp Community