Ind vs Eng 2nd Test Preview : भारतासमोर आव्हान मालिकेत पुनरागमन करण्याचं

Ind vs Eng 2nd Test Preview : इंग्लंडच्या बॅझ-बॉल क्रिकेटला उत्तर शोधण्याची वेळ भारतीय संघावर आली आहे

252
Ind vs Eng 2nd Test Preview : भारतासमोर आव्हान मालिकेत पुनरागमन करण्याचं
Ind vs Eng 2nd Test Preview : भारतासमोर आव्हान मालिकेत पुनरागमन करण्याचं

ऋजुता लुकतुके

इंग्लंडने (England) भारतात आल्या आल्या आक्रमक क्रिकेट खेळणार हे स्पष्ट केलं होतं. त्यांच्या बॅझ-बॉल क्रिकेटचा एक महत्त्वाचा भाग आहे आक्रमक विचार आणि आक्रमक चाली. या बाबतीत बेन स्टोक्स आणि त्याचा संघ भारतापेक्षा दोन पावलं पुढेच राहिला. पहिल्या डावात २४६ धावांमध्ये गुंडाळला गेल्यावर आणि १९० धावांनी पिछाडीवर पडल्यावर त्यांनी काय चुका झाल्या याचा काही तासांत आढावा घेतला. त्या चुका दुसऱ्या डावांत टाळल्या. आणि भारतावरच डाव उलटवून पहिली कसोटी २८ धावांनी दिमाखात जिंकली. ( Ind vs Eng 2nd Test Preview)

(हेही वाचा – Devendra Fadnavis : विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प; देवेंद्र फडणवीस यांनी मानले अर्थमंत्र्यांचे आभार)

ऑली पोपने (Ollie Pope) तर भारतात फिरकीपटूंसमोर फलंदाजी कशी करायची, याचा वस्तुपाठच घालून दिला. तळाच्या फलंदाजांना बरोबर घेऊन त्याने इंग्लंडला (England) विजय मिळवून दिला. आता वेळ अशी आहे की, दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतासमोर दोन आव्हानं आहेत. इंग्लंडच्या आक्रमक क्रिकेटला उत्तर देणं. आणि दुसरं म्हणजे उपलब्ध खेळाडूंनिशी. विराट कोहली पहिले दोन कसोटी सामने खेळणार नाहीए. त्यातच के एल राहुल आणि रवींद्र जाडेजाही जायबंदी झालेत. त्यामुळे भारताची मधली फळी अगदीच पोरकी झाली आहे. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत रोहितला साथ असेल ती यशस्वी जयसवाल, फॉर्मात नसलेला शुभमन आणि नवखे रजत पाटिदार किंवा सर्फराझ यांच्याकडून…

विशाखापट्टणममध्ये भारतीय संघ मागचे दोन दिवस कसून सराव करतोय.

आणि संघासमोर आधीच्या कसोटीतील चुका टाळण्याचं आव्हान असणार आहे. राहुल आणि जाडेजांना झालेल्या दुखापतीनंतरही निवड समितीने चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) किंवा अजिंक्य रहाणे या अनुभवी खेळाडूंचा विचार न करता, रजत पाटिदार आणि सर्फराझ खान यांना संधी दिली. त्यामुळे संघाचं धोरण पक्कं आहे. भारतीय संघ पुढे जातोय. आणि अशावेळी नवीन खेळाडूंवर जबाबदारी असेल ती संघात जागा पक्की करण्याची. अर्थात, या कसोटीत संधी नेमकी कुणाला मिळते हे आधी बघावं लागेल.

रजत संघात येईल की, सर्फराझ? जाडेजा ऐवजी कुलदीपला संधी मिळेल की अष्टपैलू वॉशिंग्टनला? की भारतही इंग्लंड सारखाच ४ फिरकीपटूंना पसंती देईल? असे सगळे प्रश्न भारतीय संघ प्रशासनासमोर असतील. फिरकीपटूंनाही इंग्लिश फलंदाजांना थांबवण्यासाठी वेगळी रणनीती आखावी लागणार आहे.

दुसरीकडे, इंग्लिश (England) संघ पहिल्या चुकांतून लवकर सावरलाय. आता हाच संघ ड्रायव्हिंग सीटवर आहे. त्यांना फक्त कामगिरीची पुनरावृत्ती करायची आहे. विशाखापट्टणमची कसोटी रंगतदार होईल एवढं नक्की. ( Ind vs Eng 2nd Test Preview)

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.