Railway Minister : रेल्वे मंत्रालय करणार महाराष्ट्रात 80 हजार कोटींची कामे

227

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार महाराष्ट्रातील रेल्वेच्या सोयीसुविधा वाढविण्यासाठी 80 हजार कोटी रूपयाची गुंतवणूक करणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रातील पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी रेल्वेच्या विकासासाठी दिलेल्या निधीबाबत रेल्वेमंत्री (Railway Minister) अश्विनी वैष्णव यांनी विविध राज्यांतील पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातील पत्रकारांशी बोलताना अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, रेल्वेकडून महाराष्ट्रात 80 हजार कोटी रूपयाची विकासकामे केली जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षांच्या काळात देशातील पायाभूत सोयी—सुविधा वाढविण्यावर भर दिला आहे.

रेल्वेमंत्र्यांनी (Railway Minister) यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुकही केले. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राची धुरा हाती घेतल्यापासून राज्यात रखडलेल्या प्रकल्पांच्या मार्गातील अडथळे वेगाने दूर होत आहेत. महाराष्ट्र फार मोठे राज्य आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या विकासावर विशेष लक्ष आहे. रालोआ सरकारच्या काळात महाराष्ट्राला मिळणारा आर्थिक वाटा आणि त्या आधीच्या सरकारकडून दिला जाणारा आर्थिक वाटा याची तुलना केली तर ही बाब सहज लक्षात येते असे त्यांनी आवर्जुन सांगितले.

महाराष्ट्राला 15 हजार 554 कोटी रूपये देण्यात आले

मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्रात रेल्वेच्या सोयीसुविधांचे कामकाज वेगाने होत असल्याचे नमूद करीत रेल्वे मंत्री (Railway Minister) म्हणाले की, दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्राला रेल्वे बजेटमधून जवळपास 1171 कोटी मिळायचे. मात्र, मोदींच्या काळात ही रक्कम कितीतरी पटीने वाढली आहे. मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्राला तब्बल 15 हजार 554 कोटी रूपये देण्यात आले आहे. ही रक्कम 1300 पट जास्त आहे.

पंतप्रधानांच्या काळात महाराष्ट्रातील रेल्वेच्या कामाची प्रगती फार चांगली असल्याचे सांगत अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, 2009 ते 2014 या काळात राज्यात दरवर्षी 58 किलोमीटर रेल्वे ट्रक तयार होत होते. परंतु आता 400 किमी रेल्वेट्रक तयार होत आहेत. ब्रॉडगेज लाईनवरील विद्युतीकरणाचे काम जवळवास 98 टक्के पूर्ण झाले आहे आणि उरलेले काम लवकरात लवकर पूर्ण केले जाणार आहे. 128 रेल्वे स्थानकांचे पुन:निर्माण केले जात आहेत. गेल्या दहा वर्षांत 816 ब्रिज आणि अंडरपास झाले आहेत. वन स्टेशन वन प्रॉडक्ट या योजनेंतर्गत 170 वन स्टेशन वन स्टॉल तयार झाले आहेत. यामुळे लोकांचे उत्पन्न वाढले असल्याचेही त्यांनी सांगितले.

रेल्वे अपघातला आळा घालणा—या कवच यंत्रणेच्या कामाबाबत सांगताना रेल्वे मंत्री म्हणाले की, कवचचे पाच सिस्टम असतात. यात ट्रॅकला जोडून आप्टीकल फायबर बसविले जाते. महाराष्ट्रात जवळपास 8040 किलोमीटरचे आप्टीकल फायबर केबल बसविण्यात आले आहे. 269 टेलिकॉम टॉवरचे काम पूर्ण झाले आहे. 186 स्टेशनवर कवच डाटा रूम तयार झाले आहे. यास स्टेशन कवच म्हणततत.  827 किमीपर्यंत  ट्रॅकसाईड उपकरणे बसविण्यात आले आहेत आणि 170 इंजिनवरही कवच उपकरणे बसविण्यात आले आहेत.

(हेही वाचा Interim budget : महिलांसाठी विशेष असणारा अंतरिम अर्थसंकल्प; काय म्हणतात महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष?)

रेल्वेमंत्री म्हणाले की, दहा 10 वर्षांपूर्वी जेव्हा रेल्वे अर्थसंकल्प सादर केला जायचा तेव्हा तीन चार नवीन गाड्यांची घोषणा केली जायची. याशिवाय दुस—या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष दिले जात नव्हते. आधीच्या सरकारच्या काळात ट्रॅकची क्षमता, नवीन तंत्रज्ञान, सुरक्षा आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब याकडे काहीही लक्ष दिले जात नव्हते. परंतु, मोदी सरकारने रेल्वेची क्षमता वाढविण्यापासून ते अद्यावत तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत केले आहे.

कोणते प्रकल्प सुरू आहेत?

दहा वर्षांपूर्वी रेल्वेचा बजट 14 हजार कोटीच्या जवळपास असायचा. मात्र, नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ही रक्कम दोन लाख 52 हजार कोटीवर नेली आहे. आता याचे परिणाम दिसू लागले आहेत. देशात दहा वर्षांत 26 हजार किलोमीटरचे नवीन रेल्वे ट्रक बनविले गेले आहेत. देशाच्या बहुतांश भागात ब्रॉडगेज ट्रॅकवरील विद्युतीकरणचे काम पूर्ण झाले आहे. नवीन तंत्रज्ञानावर आधारित रेल्वे आल्या आहेत, असेही (Railway Minister) वैष्णव यांनी सांगितले.

अर्थमंत्र्यांनी आजच्या बजटमध्ये तीन नवीन रेल्वे कॉरिडोर गोल्डर क्वाड्रीलेटरलसाठी तरतूद करण्यात आली आहे. यामुळे पुढील सहा ते आठ वर्षांत 40 हजार किलोमीटरचे नवीन रेल्वे ट्रॅक बनविले जाणार आहेत. हा कॉरिडॉर अमृत चतुर्भुज राहणार आहे. रेल्वेची क्षमता दुप्पट होणार आहे. सध्या 700 कोटी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 1000 कोटी प्रवासी प्रवास करू शकतील. यात वेटिंग तिकीटची भानगड संपेल. देशाच्या गरजेनुसार हा प्रकल्प बनविण्यात आला आहे. दहा वर्षापूर्वी दररोज चार किलोमीटर ट्रक बनत होते आता 15 किलोमीटर ट्रक बनत आहे. 1300 स्टेशनवर पूर्णपणे नवीन बनवित आहेत. जर्मनी आणि स्वित्झर्लंड या दोन्ही देशातील रेल्वे ट्रॅकएवढे नवीन रेल्वे ट्रॅक गोल्डन कॉरिडोरमुळे तयार होणार आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.