‘या’ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे पोलिस दलात पोकळी

या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांनंतर महिन्याभरातच या अधिकऱ्यांच्या मुंबई बाहेर बदल्या करण्यात आल्यामुळे मुंबई पोलिस दलात पोकळी निर्माण झाली आहे.

153

मुंबईतील गुन्हेगारांवर वचक ठेवून, गुंड टोळ्यांच्या नांगी ठेचणाऱ्या मुंबई पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांची मुंबई बाहेर झालेल्या बदल्यांमुळे मुंबई पोलिस दलात एक पोकळी निर्माण झाली आहे. वाझे प्रकरणानंतर या अधिकाऱ्यांना सर्वात प्रथम गुन्हे शाखेतून दूर करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची थेट मुंबईच्या बाहेर बदली केल्यामुळे पोलिस दलात चर्चा सुरू झाली आहे.

टॉप पोलिस अधिकारी मुंबईच्या बाहेर

मुंबई पोलिस दलात ज्या अधिकाऱ्यांची गुंड टोळ्यांवर दहशत होती, अशा मुंबई गुन्हे शाखेतील टॉप अधिकाऱ्यांची मुंबई बाहेर बदली करण्यात आल्यामुळे, मुंबई पोलिस दलात चर्चेला उधाण आले आहे. तसेच ठाणे पोलिस दलाच्या गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांची देखील मुंबई बाहेर बदली करण्यात आली आहे. सुधीर दळवी, नंदकुमार गोपाळे, सचिन कदम आणि केदारी पवार असे या पोलिस निरीक्षकांची नावे आहेत. हे चारही अधिकारी मुंबई गुन्हे शाखेत मागील अनेक वर्षांपासून काम करत आहेत. मुंबईतील गुंड टोळ्यांचा बिमोड करुन गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात या अधिका-यांचा हातखंडा होता. तसेच ठाण्यातील गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवणारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांना देखील मुंबईच्या बाहेर टाकण्यात आले आहे.

(हेही वाचाः पोलिस दलातही कोरोनाचे थैमान… मृतांचा आकडा वाढला)

अशा आहेत बदल्या

मंगळवारी रात्री उशिरा या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. सुधीर दळवी यांची बदली नानविज येथे पोलिस प्रशिक्षण केंद्रात करण्यात आली असून, नंदकुमार गोपाळे यांना जालना पोलिस प्राशिक्षण केंद्र येथे पाठवण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक केदारी पवार यांची बदली जळगाव जातप्रमाणपत्र पडताळणी समिती येथे करण्यात आली आहे. तसेच पोलिस निरीक्षक सचिन कदम यांना औरंगाबाद येथे बदली करण्यात आली आहे.

पोलिस दलात पोकळी

निलंबित एपीआय सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबईचे नवे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गुन्हे शाखेतील अनेक चांगल्या अधिकऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात नंदकुमार गोपाळे, सचिन कदम आणि केदारी पवार यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांनंतर महिन्याभरातच या अधिकऱ्यांच्या मुंबई बाहेर बदल्या करण्यात आल्यामुळे मुंबई पोलिस दलात पोकळी निर्माण झाली आहे. ठाण्यातील गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे हे ठाणे पोलिस दलातील एक धडाकेबाज चेहरा असून, ठाण्यातील गुन्हेगारी, गुंड टोळ्यांवर त्यांचा चांगलाच वचक होता. ठाकरे यांच्या बदलीमुळे ठाणे पोलिस दलात सुद्धा चर्चा सुरू झाली आहे.

(हेही वाचाः ठाणे शहर पोलिस आयुक्त फणसळकर यांना बढती!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.