N. srinivasan ED Raid : चेन्नई सुपर किंग्स संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांच्या इंडिया सिमेंटसवर ईडीची धाड

इंडिया सिमेंट ही देशातील सर्वात मोठी सिमेंट कंपन्यांपैकी एक आहे. महसुलाच्या बाबतीत ही ९वी सर्वात मोठी सूचीबद्ध सिमेंट कंपनी आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये त्याचे ७ प्लांट आहेत.

319
N. srinivasan ED Raid : चेन्नई सुपर किंग्स संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांच्या इंडिया सिमेंटसवर ईडीची धाड

फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्टच्या (फेमा) उल्लंघन प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन (N. srinivasan ED Raid) यांच्या इंडिया सिमेंटस् कंपनीच्या कार्यालयावर छापे टाकले आहेत. ईडीने बुधवारपासून (३१ जानेवारी) नवी दिल्ली आणि चेन्नई येथे कारवाई सुरू केली असून ही कारवाई गुरुवारी (१ फेब्रुवारी) देखील सुरू असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली.

(हेही वाचा – World Wetlands Day 2024 : काय आहे जागतिक वेटलँड्स डे?)

इंडिया सिमेंट ही देशातील सर्वात मोठी सिमेंट कंपन्यांपैकी एक आहे. महसुलाच्या बाबतीत ही ९वी सर्वात मोठी सूचीबद्ध सिमेंट कंपनी आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये त्याचे ७ प्लांट आहेत. चेन्नईतील इंडिया सिमेंटच्या २ आणि दिल्लीतील एका कार्यालयात बुधवारपासून झडती करण्यात आली. आपण एजन्सीच्या तपासात सहकार्य करत असल्याचे कंपनीचे (N. srinivasan ED Raid) म्हणणे आहे.

(हेही वाचा – Purnendu Patri : जाणून घ्या हरहुन्नरी कलाकार पूर्णेंदु पत्रींबद्दल)

श्रीनिवासन (N. srinivasan ED Raid) आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्सचे मालक देखील आहेत. त्यांच्या कुटुंबासह त्यांची २८.१४ टक्के हिस्सेदारी आहे. श्रीनिवासन आणि त्यांची मुलगी रूपा गेल्या वर्षीच चेन्नई सुपर किंग्जचे संघाचे मालक म्हणून परतले. त्यांनी २००८ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज ९१ मिलियन डॉलर्सला विकत घेतले होते. एन. श्रीनिवासनच्या सीएसके टीमचे नाव २०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंगमध्ये आले होते. यानंतर संघावर २ वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आता फेमा कायद्याच्या उल्लंघन प्रकरणी त्यांनी ईडीच्या कारवाईचा समाना करावा लागतो आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.